एकीकडे जगभरातील जवळपास 40% लोकांपर्यंत अजूनही इंटरनेट पोहोचलं नाही. तर दुसरीकडे जपानी इंजिनियर्सनी अशी टेक्नॉलॉजी विकसित केली आहे जी सध्याचा विक्रमी इंटरनेट स्पीड दुप्पट करू शकते. जापानच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशंस टेक्नोलॉजी (NIICT) च्या लॅबमध्ये झालेल्या चाचणीत 319 टेराबाइट्स (TB) प्रति सेकंद इंटरनेट स्पीडची नोंद करण्यात आली आहे. हा जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड आहे. याआधीच 178 टेराबाइट्स प्रति सेकंदाचा विक्रम देखील यूके आणि जापान यांच्या नावावर होता.
न्यूज रिपोर्ट्सनुसार, जापानच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशंस टेक्नोलॉजी (NIICT) लॅबमध्ये ही टेस्टिंग करण्यात आली आहे, या टेस्टिंगमध्ये मिळालेल्या स्पीडने कोणतीही मोठी फाईल काही सेकंदात डाउनलोड करता येत होती. हा स्पीड मिळवण्यासाठी खास धातुपासून बनलेल्या अॅम्प्लिफायर आणि वेगवेगळ्या वेवलेंथसाठी 552 चॅनेल कॉम्ब लेजरचा, तसेच माध्यम म्हणून ऑप्टिकल फायबर केबलचा वापर करण्यात आला होता.
या टेस्टिंग टीमने कोणत्याही परफॉर्मन्स ड्रॉपविना 3000 किलोमीटर अंतरावर यशस्वीरीत्या डेटा नेला आणि प्रसारित केला. विशेष म्हणजे यापेक्षा जास्त स्पीड सध्या केला जाऊ शकतो, असे या टीमचे म्हणणे आहे. हा आतापर्यंतचा जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड आहे.