नवी दिल्ली : 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार देशातील बहुतांश भागात झाला आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडून भारतात 5G सेवा पुरवली जात आहे. आता काही कंपन्यांनी मिळून पहिले 6G डिव्हाईस जगासमोर आणले आहे.
6G डिव्हाईस हे 5G पेक्षा जास्त वेगाने काम करण्यास सक्षम आहे. हे डिव्हाईस 100 गीगाबिट्स प्रति सेकंद या वेगाने डेटा ट्रान्समिट करण्यास सक्षम आहे. त्यामुळे या डिव्हाईसचे खास वैशिष्ट्य जाणून घेऊया.
जपानने जगातील पहिल्या 6G डिव्हाईसचा प्रोटोटाइप सादर केला आहे. हे 5G पेक्षा 20 पट वेगाने काम करते. हे डिव्हाईस 300 फुटांपर्यंतचे क्षेत्र व्यापण्यास सक्षम आहे. हा स्मार्टफोन असेल असे अनेकांना वाटत असेल. पण, हे डिव्हाईस स्मार्टफोन नाही.
डोकोमो, एनटीटी कॉर्पोरेशन, एनईसी कॉर्पोरेशन आणि फुजीत्सू यांसारख्या कंपन्यांच्या भागीदारीद्वारे हे विशेष प्रकारचे डिव्हाईस विकसित करण्यात आले आहे.
बऱ्याच दिवसांपासून डिव्हाईसवर कामया कंपन्यांकडून या डिव्हाईसवर बरेच दिवस काम सुरू होते. रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यात 11 एप्रिल रोजी या डिव्हाईसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. तसेच, 6G ची चाचणी फक्त एकाच डिव्हाईसवर करण्यात आली आहे. मात्र, या डिव्हाईसची व्यावसायिक चाचणी अद्याप झालेली नाही.
अनेक देश करत आहेत कामअनेक देश 6G कनेक्टिव्हिटीवर काम करत आहेत. भारतातही यावर काम सुरू आहे. यामध्ये यूजर्सना 5G पेक्षाही वेगवान कनेक्टिव्हिटी मिळेल. 6G कनेक्टिव्हिटीमुळे युजर्स सेकंदात कोणतेही काम पूर्ण करण्यास सक्षम असतील.