Recharge Plans under 400: दूरसंचार कंपनी Vi उर्फ वोडाफोन आयडिया आणि मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जिओ यांच्याकडे केवळ उत्तम प्रीपेड प्लॅनच नाहीत तर पोस्टपेड प्लॅन देखील उत्तम फायदे देतात. आज आपण Reliance Jio आणि Vi सोबत उपलब्ध असलेल्या 399 रुपयांच्या प्लॅनबद्दल माहिती जाणून घेऊयात. जरी दोन्ही प्लॅनची किंमत सारखीच असली तरी डेटा आणि इतर फायदे एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. डेटा फायद्यांच्या बाबतीत कोण आघाडीवर आहे आणि OTT फायद्यांच्या बाबतीत कोण पुढे आहे हे जाणून घेऊयात.
Jio 399 Plan Details Jio पोस्टपेड प्लॅनसह, कंपनी आपल्या वापरकर्त्यांना 75 GB हाय-स्पीड डेटा ऑफर करते. यासोबतच याच्या वापरकर्त्यांना कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. 75 जीबी डेटा वापरल्यानंतर, 10 रुपये प्रति जीबी दराने शुल्क आकारले जाते. या प्लानमध्ये 200 GB डेटा रोलओव्हर सुविधा देखील उपलब्ध आहे. इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, या जिओ प्लॅनसह, तुम्हाला नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा लाभ दिला जाईल. यासोबतच या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio अॅप्सचा मोफत प्रवेशही मिळेल.
Vi 399 Plan Details Vodafone Idea प्लॅनमध्ये कंपनी आपल्या वापरकर्त्यांना फक्त 40 GB हाय-स्पीड डेटा ऑफर करते, परंतु जर तुम्ही कंपनीच्या अधिकृत साइट MyVI.in वरून हा प्लान रिचार्ज केला तर तुम्हाला 150 GB अतिरिक्त डेटा मोफत दिला जाईल. या प्लॅनमध्ये दरमहा 200 GB डेटा रोलओव्हर आणि 100 SMS दिले जातील. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला Zee5 प्रीमियम, 6 महिन्यांसाठी जाहिरातमुक्त हंगामा म्युझिक आणि Vi Movies आणि TV वर मोफत प्रवेश मिळेल.