देशात शाओमीचे सर्वाधिक स्मार्टफोन आहेत. स्वस्त किंमतीत मोबाईल आणत शाओमीने सॅमसंग, मायक्रोमॅक्ससह अनेक कंपन्यांना पळती भुई थोडी केली होती. आता ५जी मध्येही शाओमीचे फोन बऱ्यापैकी आले आहेत. परंतू शाओमी वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
तुम्ही जर शाओमी आणि रिलायन्स जिओचे युजर असाल तर तुम्हाला शाओमीच्या काही स्मार्टफोन्सवर जिओ ५जी सेवा वापरता येणार नाहीय. जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. तर शाओमी हा सर्वात मोठा ब्रँड आहे. यामुळे या कंपनीच्या फोनवर भारतातील एक मोठा ग्राहक वर्ग जिओचे ५जी वापरू शकणार नाहीय.
Telecom Talk च्या रिपोर्टनुसार Xiaomi Mi 10 आणि और Xiaomi Mi 10i स्मार्टफोनवर Jio 5G सर्व्हिस वापरता येणार नाहीय. याचे कारण असे आहे की, Xiaomi Mi 10 आणि Xiaomi Mi 10i हे Jio च्या 5G स्टँड अलोन नेटवर्कला सपोर्ट करणार नाहीत.
5G नेटवर्क भारतात दोन प्रकारे काम करते. यामध्ये जिओ स्टँड अलोन 5जी नेटवर्कवर काम करते, तर एअरटेल नॉन स्टँड अलोन नेटवर्कवर काम करते. नॉन स्टँड अलोन नेटवर्कमध्ये फक्त 4G टॉवर अपग्रेड केले जाते, तर स्टँड अलोनमध्ये 4G टॉवरची मदत घेतली जात नाही. म्हणजेच स्वतंत्र टॉवर असतो. हेच कारण आहे की Jio चे 5G इंटरनेट Mi 10 आणि Mi 10i स्मार्टफोनमध्ये काम करू शकणार नाही. या दोन्ही स्मार्टफोन्सना 5G स्टँडअलोन किंवा 5G SA सॉफ्टवेअर दिलेले नाही.
Xiaomi Mi 10 Smartphone 2020 मध्ये लाँच झाला होता. Xiaomi Mi 10i स्मार्टफोन वर्ष 2021 मध्ये लाँच झाला होता. भारतात Mi 10 ची सध्याची किंमत 31,999 रुपये आहे. तर Mi 10i स्मार्टफोन 21,999 रुपयांना येतो. यामुळे हा मोबाईल असलेल्या लोकांना एकतर एअरटेलकडे स्विच व्हावे लागेल किंवा दुसरा मोबाईल घ्यावा लागणार आहे.