नवी दिल्ली : जिओसह (Jio) सर्व खासगी दूरसंचार कंपन्यांनी गेल्या जुलै महिन्यात आपल्या मोबाइल दरात 22 टक्क्यांनी वाढ केली होती. तेव्हापासून मोबाईल रिचार्ज प्लॅन खूपच महाग झाले आहेत. जिओकडे सध्या 14 दिवसांपासून ते 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह रेग्युलर रिचार्ज प्लॅन आहे, ज्यामध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट डेटा, एसएमएस इत्यादींचा लाभ मिळतो. 28 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनपेक्षा 84 दिवसांचे प्लॅन स्वस्त आहेत, ज्यामुळे बहुतेक युजर्स 3 महिन्यांच्या प्लॅनसह रिचार्ज करतात.
तुम्ही देखील जिओ युजर्स असाल आणि 84 दिवसांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर जिओचा हा स्वस्त रिचार्ज प्लॅन 859 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय, यूजर्सना फ्री नॅशनल रोमिंगचाही लाभ मिळतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा आणि 100 मोफत एसएमएसचा लाभ मिळतो.
अशाप्रकारे, एकूणच युजर्सला 168GB डेटाचा लाभ मिळेल. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल आणि तुम्ही जिओच्या True 5G नेटवर्कमध्ये असाल तर तुम्ही अनलिमिटेड डेटा वापरू शकता. तसेच, या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV आणि Jio Cinema ॲप्स तसेच Jio Cloud मध्ये एक्सेस मिळू शकतो.
479 रुपयांचा प्लॅनया प्रीपेड रिचार्ज प्लॅन व्यतिरिक्त जिओचा 84 दिवसांचा व्हॅल्यू प्लॅन देखील आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनसाठी युजर्सला 479 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो. तसेच, युजर्सला एकूण 1,000 मोफत एसएमएसचा लाभ दिला जातो. हा प्रीपेड प्लॅन विशेषतः अशा युजर्ससाठी आहे, जे त्यांचा नंबर फक्त कॉलिंगसाठी वापरतात. यामध्ये युजर्सना फक्त 6GB हाय स्पीड डेटा मिळतो. हा डेटा युजर्स व्हॅलिडिटी संपण्यापूर्वी वापरू शकतात.