आजच्या काळात प्रत्येकजण हायस्पीड आणि चांगल्या कनेक्टिव्हिटीची मागणी करत आहे. मार्केटमध्ये असलेल्या टेलीकॉम कंपन्या चांगले प्लॅन्स ऑफर करतात. पण, आज आम्ही तुम्हाला Jio आणि Airtel सोबतच Netplus च्या 999 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. ही कंपनी Jio-Airtel सारख्या मार्केटवर वर्चस्व गाजवत नाही, पण त्यांचे प्लान्स जोरदार आहेत.
नेटप्लस- 999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅनNetplus सध्या उत्तरेकडील सात भारतीय राज्यांमध्ये आपली सेवा देत आहे. Netplus 1 Gbps पर्यंतच्या स्पीडने इंटरनेट कनेक्टिव्हिटी देते. याशिवाय या प्लॅनमध्ये OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळतो. Netplus 999 रुपये प्रति महिन्याच्या दराने 200 Mbps इंटरनेट स्पीड देते. या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित डेटाचा लाभ मिळतो. तसेच, Amazon प्राइम व्हिडिओ सबस्क्रिप्शन, Zee5 प्रीमियम, Voot Select आणि EROS नाऊचे बंडल पॅक घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
जिओचा 999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅनभारतातील सर्वात विश्वासार्ह सेवा प्रदात्यांपैकी एक, JioFiber 30 दिवसांच्या वैधतेसाठी 999 रुपयांच्या किमतीत 150 Mbps इंटरनेट स्पीड डेटा प्लॅन ऑफर करते. या प्लॅनची FUP मर्यादा 3300Gb किंवा 3.3TB आहे. वापरकर्त्यांना या प्लॅनसह 150 Mbps अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळते. हा प्लॅन वेबसाइटवर एक लोकप्रिय प्लॅन म्हणून सूचीबद्ध आहे. यात Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Eros Nowसह 15 OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळतो.
एअरटेलचा 999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅनब्रॉडबँड सेवा प्रदान करण्याच्या बाबतीत एअरटेल ही बाजारपेठेतील सर्वात प्रमुख कंपनी आहे. एअरटेल त्याच्या Xstream फायबर कनेक्शनद्वारे OTT ऍक्सेससह 'एंटरटेनमेंट' पॅकपासून सुरू होणारे प्लॅन्स ऑफर करते. हे प्लॅन्स 999 रुपयांच्या मासिक किमतीत 200 Mbps इंटरनेट स्पीड देते. यात 3.3TB किंवा 3300GB FUP डेटा मिळतो. एअरटेल त्याच्या ब्रॉडबँड प्लॅनसह 'एअरटेल थँक्स बेनिफिट्स' देखील ऑफर करते, ज्यामध्ये विंक म्युझिकसह Amazon Prime आणि Disney+ Hotstar OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळतो. हा एअरटेलचा सर्वाधिक विकला जाणारा प्लॅन आहे.