भारतीय टेलिकॉम क्षेत्रात जिओची एन्ट्री झाल्यापासून गेल्या सहा-सात वर्षांत मोठी क्रांती झाली आहे. ४जी सेवेत मोठी झेप घेतल्याने जिओनेएअरटेल आणि व्होडाफोन, आयडिया सारख्या कंपन्यांना मागे टाकले होते. स्वस्त रिचार्जमध्ये फास्ट डेटा, मोफत कॉलिंग दिल्याने जिओने आघाडी घेतली आहे. परंतू, पोस्टपेड प्लॅनमध्ये आजही स्पर्धा लागलेली नसून व्होडाफोन-आयडिया यामध्ये जिओपेक्षाही जास्त डेटा, सुविधा देत आहे.
जिओकडे तीन प्लॅन्स आहेत. सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत आधी १९९ रुपये होती आणि ती आता २९९ रुपये झाली आहे. २९९ रुपयांमध्ये दर महिन्याला ३० जीबी डेटा व जिओ सिनेमा व जिओ टीव्हीची सबस्क्रिप्शन मिळते. तर ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा, जिओ सिनेमा व जिओ टीव्हीची सबस्क्रिप्शन मिळते. इतर कोणत्याही ओटीटीची सबस्क्रिप्शन मिळत नाही. जिओचा सर्वात महाग प्लॅन १४९९ रुपयांचा असून त्यासोबत नेटफ्लिक्स व ऍमेझॉन प्राईम दिले जाते.
तर एअरटेलकडे २ पोस्टपेड प्लॅन्स आहेत. सर्वात स्वस्त प्लॅन ३९९ रुपयांचा असून यामध्ये ४०जीबी डेटा कोटा मिळतो, २००जीबीपर्यंत डेटा रोल ओव्हरची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये ओटीटी मिळत नाही. तर दुसऱ्या प्लॅनमध्ये ओटीटी मिळते. ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ७५ जीबी डेटा कोटा मिळतो, २०० जीबीपर्यंत डेटा रोल ओव्हरची सुविधा मिळते. यात ऍमेझॉन प्राईम आणि डिस्ने+हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन दिले जाते.
व्होडाफोन आयडिया अद्याप फाईव्ह जी मध्ये आलेली नसली तरी देखील कंपनीने पोस्टपेडमध्ये जास्त पर्याय ठेवले आहेत. वी मॅक्स ४०१ मध्ये ५०जीबी डेटा मिळतो, २००जीबीपर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा मिळते. तसेच मध्यरात्री १२ पासून ते सकाळी सहापर्यंत अमर्यादित डेटा दिला जातो. सोनीलिव, झी५ आणि वी मुव्हीज अँड टीव्हीची सबस्क्रिप्शन निःशुल्क मिळते. ५०१ प्लॅनमध्ये ९०जीबी डेटा मिळतो, यात ऍमेझॉन प्राईम, डिस्ने+हॉटस्टार चे सबस्क्रिप्शन मिळते.
वी मॅक्स ७०१ आणि ११०१ मध्ये अनलिमिटेड डेटा मिळतो. पोस्टपेडमध्ये अनलिमिटेड डेटा देणारी व्होडाफोन ही एकमेव कंपनी आहे. याचसोबत अन्य ओटीटी सबस्क्रिप्शनही दिली जातात.