मोबाईल रिचार्ज करताना आपल्या मनात पहिला प्रश्न येतो, तो म्हणजे, कमी पैशांत अधिक बेनिफिट्स कोण देतं असा. अर्थात, जो नेटवर्क प्रोव्हायडर आपल्याला कमी पैशांत अधिक बेनिफिट्स देतो, शक्यतो आपण त्याचेच रिचार्ज करतो. खरे तर, Jio, Airtel आणि Vodafone या सर्व कंपन्या 200 रुपयांच्या आतील रिचार्ज देतात. मात्र, अनेक वेळा आपल्याला त्यांचे बेनिफिट्स माहीत नसतात. तर आम्ही आपल्यासाठी आज असे काही रीचार्ज प्लॅन्स घेऊन आलो आहोत.
Jio 119 Prepaid Plan-Jio च्या 119 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 दिवसांसाठी Unlimited Voice Calling, 300 SMS, 1.5GB Daily Data मिळतो. यात Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शनही उपलब्ध आहे. तसेच, 149 रुपयांच्या Jio Prepaid Plan मध्ये रोज 1GB Data मळतो. हा प्लॅन 20 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात रोज Unlimited Calling आणि 100 SMS मिळतात. असाच एक प्लॅन 179 रुपयांचा आहे. यात सर्व सुविधा मिळतील याची व्हॅलिडिटी 24 दिवसांची असेल.
Vi Recharge-Vodafone-Idea मध्ये 129, 149, 155 आणि 199 रुपयांचे प्लॅन आहेत. 129 रुपयांच्या रिचार्जमध्ये 200MB lump sum data मिळतो. याची व्हॅलिडिटी 18 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये Unlimited Calling मिलळते. मात्र, यात SMS ची सुविधा नाही. 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज 1GB डेटा मिळतो. यात Unlmited Calling चाही समावेश आहे. याची व्हॅलिडिटी 21 दिवसांची आहे. 155 रुपयांत याच प्लॅनची व्हॅलिडिटी 24 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये 300 फ्री SMS मिळतात.
Airtel Recharge-Airtel 155 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 24 दिवसांची असते. या प्लॅनमध्ये रोज 1GB डेटासह Unlimited Calling आणि 300 SMS देखील मिळतील. हा प्लॅन घेतल्यानंतर 1 महिन्याचे Prime Video सब्सक्रिप्शनही मिळते. 179 रुप्यांच्या प्लॅनमध्ये 2GB डेटा, 300 SMS, Unlimited Calling 30 दिवसांसाठी मिळते.