टेलीकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे TRAI चा ताजा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधून भारतातील टेलिकॉम कंपन्यांच्या सब्सक्रायबर्सची फेब्रुवारी 2022 च्या शेवटी असलेली संख्या समोर आली आहे. त्यानुसार, अजूनही Jio आणि Vodafone idea च्या ग्राहक संख्येत घट सुरु आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये रिचार्ज वाढवल्यापासून या कंपन्यांचे ग्राहक कमी होत आहेत.
याउलट जानेवारी प्रमाणे फेब्रुवारीमध्ये देखील Airtel अशी एकमेव टेलीकॉम कंपनी होती, जिच्या सब्सक्रायबर्सची संख्या वाढली आहे. ताज्या अहवालानुसार, फेब्रुवारीमध्ये एयरटेलनं 1.59 मिलियन नवीन सब्सक्रायबर्स जोडले आहेत. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत कंपनीकडे एकूण 358.07 मिलियन सब्सक्रायबर्स झाले आहेत.
Reliance Jio कडे पाहता, कंपनीनं फेब्रुवारीमध्ये 3.66 मिलियन युजर्सना गमावले आहेत, त्यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या फेब्रुवारीच्या शेवटी 402.73 मिलियन इतकी राहिली आहे. Vodafone Idea चे सब्सक्रायबर्स देखील पुन्हा एकदा घटले आहेत. फेब्रुवारीमध्ये 1.53 मिलियन सब्सक्रायबर्सनी ‘व्ही’ चा निरोप घेतला आहे, सध्या फक्त 263.59 सब्सक्रायबर्स उरले आहेत.
भारतातील वायरलेस सब्सक्रायबर्सची संख्या कमी झाली
भारतातील एकूण वायरलेस सब्सक्रायबर्सची संख्याच घटली आहे. जानेवारीत 1,145.24 मिलियन युजर्स होते, फेब्रुवारीच्या शेवटी फक्त 1,141.53 मिलियन युजर्स वायरलेस नेटवर्कवर होते. यात Jio 35.28% मार्केट शेयरसह सर्वात मोठी कंपनी आहे. 31.37 मार्केट शेयरसह Airtel दुसऱ्या आणि वोडाफोन आयडिया 23.09% सह तिसऱ्या नंबरवर आहे. तर सरकारी कंपनी BSNL कडे 9.98%, तर MTNL कडे 0.28% मार्केट शेयर आहे.