Jio Free Netflix Offer : जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. Jio च्या युजर्सची OTT प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करण्यापासून सुटका होणार आहे. कारण जिओ आपल्या ग्राहकांना OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. चला तर मग जाणून घेऊया जिओच्या ऑफर्सबद्दल. यामध्ये जिओच्या ग्राहकांना हाय स्पीड इंटरनेट डेटा तर मिळतोच शिवाय कंपनी OTT प्लॅटफॉर्मचे फ्री सब्सक्रिप्शन देखील देते.
दरम्यान, जर तुम्ही जिओ ग्राहक असाल आणि तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट तसेच OTT कंटेंटचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही Jio Fiber कनेक्शन घेऊ शकता. Jio Fiber प्लॅनमध्ये तुम्हाला ५००mbps पर्यंत स्पीड मिळू शकणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय OTT कंटेंटचा आनंद घेऊ शकता. JioFiber चा १४९९ रुपयांचा प्लॅनखरं तर Jio Fiber च्या १४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ३००mbps पर्यंत स्पीड मिळते. या प्लॅनमध्ये, जिओ ग्राहकांना Netflix, Voot Kids, ALTBalaji, Hoichoi, Amazon Prime Video, VIP, Disney + Hotstar SonyLIV, Zee5, Sun NXT, Voot Select, Shemarumi, Lionsgate Play सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे पूर्ण सबस्क्रिप्शन मिळते. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला एका वर्षासाठी मोफत Amazon प्राइम सबस्क्रिप्शन देखील मिळेल.
JioFiber चा २४९९ रुपयांचा प्लॅनJio Fiber च्या २४९९ च्या प्लॅनमध्ये तुम्हाला ५००mbps स्पीडने डेटा वापरायला मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Voot Kids, ALTBalaji, Hoichoi, Amazon Prime Video, VIP, Disney + Hotstar SonyLIV, Zee5, Sun NXT, Voot Select, Shemaroomi, Lionsgate Play सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे पूर्ण सबस्क्रिप्शन मिळेल. यासोबतच तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची देखील सुविधा मिळते.
JioFiber चा ३४९९ रुपयांचा प्लॅनJio Fiber च्या ३४९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १gbps पर्यंत स्पीड मिळतो आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इतर अनेक OTT प्लॅटफॉर्मसह Amazon Prime आणि Netflix सारख्या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता मिळते. पण या प्लॅनची वैधता ३० दिवसांची असेल.