नवी दिल्ली : रिलायन्स जिओ भारतातील एक प्रसिद्ध टेलिकॉम ऑपरेटर्स कंपनी आहे. जिओकडून युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी नवनवीन बदल करण्यात येतो. यावेळी देखील कंपनीने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन स्वातंत्र्य दिन ऑफर आणली आहे. दरम्यान, जिओने २९९९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. यामध्ये अनेक अतिरिक्त फायद्यांसह अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि आपल्या सेवांपर्यंत अॅक्सेस देत आहे.
जिओचा २९९९ रुपयांचा स्वातंत्र्य दिन ऑफर प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग, अनलिमिटेड डेटा आणि दररोज १०० एसएमएसच्या फायद्यांसह येतो. यासोबतच या प्लॅनमध्ये JioCloud, JioTV आणि JioCinemna चा एक्सेस सुद्धा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळतो. तसेच, स्वातंत्र्य दिनाच्या ऑफर अंतर्गत कंपनी स्विगी, यात्रा, अजिओ, नेटमेड्स आणि रिलायन्स डिजिटल वरून ५८०० रुपये सूट सारखे अनेक लाभ देत आहे.
Swiggy: हा प्लॅन २४९ रुपये किंवा त्याहून अधिकच्या ऑर्डर मूल्यावर १०० रुपये सूट देतो.Yatra: युजर्स फ्लाइट बुकिंगवर १५०० रुपयांपर्यंत आणि देशांतर्गत हॉटेल बुकिंगवर ४००० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. येथे कोणतेही किमान बुकिंग मूल्य नाही.Ajio:९९९ रुपयांच्या ऑर्डरवर फ्लॅट २०० रुपयांची सूट दिली जाईल.Netmeds: ९९९ रुपये+NNM Supercash च्या ऑर्डरवर २० टक्के सूट मिळेल.Reliance Digital : निवडक ऑडिओ अॅक्सेसरीजवर फ्लॅट १० टक्के सूट आणि निवडक घरगुती उपकरणांवर फ्लॅट १० टक्के सूट मिळेल.
कसे करावे रिचार्ज?२९९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन रिचार्ज करण्यासाठी तुम्ही MyJio अॅप किंवा Jio वेबसाइट ओपन करू शकता . त्यानंतर, रिचार्ज ऑप्शनवर जा आणि २९९९ रुपयांचा प्लॅन निवडा. त्यावर स्वातंत्र्य दिनाचा ऑफर टॅग असल्याची खात्री करा. एकदा निवडल्यानंतर, पेमेंट ऑप्शनसह पुढे जा आणि पेमेंट पूर्ण करा. आता तुम्ही MyJio अॅपद्वारे सर्व फायद्यांचा आनंद घेऊ शकता.