Reliance Jio नं गेल्या वर्षी भारतात आपला सर्वात स्वस्त 4G फोन सादर केला होता. परंतु त्याआधीपासूनच कंपनीच्या 5G Phone ची चर्चा सुरु होती. आता पुन्हा एकदा Jio Phone 5G च्या बातम्या येऊ लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात फीचर्स समोर आल्यानंतर आता या फोनची किंमत समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असू शकतो.
Jio Phone 5G Price
Android Central च्या रिपोर्टनुसार, Jio Phone 5G कस्टम अँड्रॉइड व्हर्जनसह भारतात लाँच केला जाईल. तसेच जियोच्या पहिल्यावहिल्या 5जी फोनची किंमत 9,000 ते 12,000 रुपयांच्या दरम्यान असेल. आता यावर तोपर्यंत विश्वास ठेवता येणार जोपर्यंत हा फोन बाजारात येत नाही. कारण कंपनीच्या JioPhone Next 4G नं आधीच ग्राहकांची निराशा केली आहे.
Jio Phone 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Jio Phone 5G मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरसह बाजारात येईल, जो क्वॉलकॉमचा सर्वात स्वस्त 5G चिपसेट आहे. सोबत एड्रेनो 619 GPU मिळेल. या फोनमध्ये N3, N5, N28, N40 आणि N78 5जी बँड मिळतील. हा फोन 4GB रॅम आणि 32GB एक्सपांडेबल स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो.
हा फोन कस्टम अँड्रॉइडसह येईल, ज्यात Google Play Services आणि Jio Digital Suite अॅप्स मिळतील. हा ओएस Android 11 वर आधारित असेल. तसेच या फोनमध्ये सर्व अॅप्स प्री-इंस्टॉल मिळतील. फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळेल. जियोच्या 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात प्रायमरी लेन्स 13 मेगापिक्सलची आणि दुसरी लेन्स 2 मेगापिक्सलची असेल. फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. यात 5000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल.
हे देखील वाचा: