Jio Phone Next 4G आता खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनची किंमत 6,499 रुपये आहे, परंतु तुम्ही हा फोन फक्त 1,999 रुपयांचे डाउनपेमेंट करून तसेच उर्वरित रक्कम ईएमआय स्वरूपात देऊन हा फोन विकत घेण्याचा पर्याय कंपनीने दिला आहे. हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून रजिस्टर करावे लागेल. पुढे आम्ही याची पद्धत सांगितली आहे:
- सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये 7018270182 सेव्ह करा.
- व्हॉट्सअॅप ओपन करा आणि वरील कॉन्टॅक्टवर Hi लिहून पाठवा.
- चॅटबॉट तुमच्या समोर जियोफोन नेक्स्ट विकत घेण्याचे पर्याय पाठवेल त्यातील योग्य पर्यायांची निवड करा.
- त्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल, ते घेऊन तुम्ही JioPhone Next 4G घेण्यासाठी जवळच्या JioMart रिटेलरकडे जाऊ शकता.
- हा फोन व्हॉट्सअॅप रेजिस्ट्रेशनविना देखील जियो मार्ट डिजिटल स्टोर किंवा Jio.com/next वरून विकत घेता येईल.
Jio Phone Next 4G Price
कंपनीच्या फायनान्सिंग ऑप्शनसह Jio Phone Next 4G स्मार्टफोन विकत घेता येईल यासाठी 1,999 रुपये डाउन पेमेंट आणि 501 रुपये प्रोसेसिंग फी द्यावी लागेल. त्यानंतर Always-on plan, Large Plan, XL Plan आणि XXL Plan या तीन फायनान्सिंग प्लॅन्स मधून एकाची निवड करावी लागेल. चला जाणून घेऊया या प्लॅन्सबाबत:
Always On: सर्वात पहिल्या प्लॅनचे नाव Always On असे आहे. यात हा फोन 18 किंवा 24 महिन्यांच्या EMI वर विकत घेता येईल. 24 महिन्यांचा पर्याय निवडल्यास ग्राहकांना दरमहा 300 रुपये द्यावे लागतील. तर 18 महिन्यांच्या पर्यायात दरमहा 350 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 5GB डेटा आणि 100 मिनिटांचा टॉक टाइम देण्यात येईल. हा डेटा आणि टॉकटाइम ईएमआय संपेपर्यंत मिळेल.
Large Plan: लार्ज प्लॅनमध्ये देखील दोन पर्याय आहेत. 24 महिन्यांच्या EMI चा पर्याय घेतल्यास प्रत्येक महिन्याला 450 रुपये आणि 18 महिन्यांसाठी 500 रुपये द्यावे लागतील. लार्ज प्लॅनमधील ग्राहकांना ईएमआय संपेपर्यंत डेली 1.5GB डेटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंग मिळेल.
XL Plan: कंपनीने XL Plan देखील सादर केला आहे. यातील 24 महिन्यांच्या EMI ऑप्शनमध्ये दरमहा 500 रुपये आणि 18 महिन्यांसाठी 550 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंग असे बेनिफिट मिळतील.
XXL Plan: कंपनीने सादर केलेला शेवटचा प्लॅन म्हणजे XXL plan. यात 24 महिन्यांच्या ईएमआयची निवड केल्यास ग्राहकांना 550 रुपये आणि 18 महिने सिलेक्ट केल्यास 600 रुपये दरमहा द्यावे लागतील. या प्लॅनची निवड करणाऱ्या ग्राहकांना देखील डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स मिळतील. ज्यात रोज 2.5GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा समावेश असेल.