शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

बापरे! 2000 नव्हे तर 15000 रुपयांवर जाणार Jio Phone Next 4G ची किंमत; समजून घ्या ईएमआयचा गोंधळ

By सिद्धेश जाधव | Published: October 30, 2021 6:51 PM

Jio Phone Next 4G Price In India: Jio Phone Next 4G विकत घेण्यासाठी कंपनीने ईएमआय ऑप्शन्स दिले आहेत, परंतु सर्व हप्ते देईस्तोवर ही 1,999 रुपयांच्या डाउन पेमेंटमध्ये मिळणार हा फोन 15700 रुपयांना पडू शकतो. या ईएमआय सोबत मोफत मिळणार डेटा आणि व्हॉइस कॉलिंग बेनिफिट मात्र विसरून चालणार नाहीत.

Jio Phone Next 4G Price In India: काल बहुप्रतीक्षित Jio Phone Next 4G ची किंमत समोर आली. Jio-Google च्या भागेदारीत बनलेला हा फोन 1,999 रुपयांमध्ये घरी नेता येणार म्हणून खूप कौतुक देखील झाले. परंतु ही किंमत हा फोन ईएमआयवर विकत घेतल्यास डाउनपेमेंट म्हणून द्यावी लागेल. कंपनीने सादर केलेल्या सर्वात मोठ्या ईएमआय प्लॅनचा अवलंब केल्यास आणि त्यात प्रोसेसिंग फी जोडल्यास या फोनची किंमत 15700 रुपयांवर जाते. चला सविस्तर जाणून घेऊया… 

Jio Phone Next 4G EMI Price 

ईएमआय ऑप्शन्सविना जियोफोन नेक्स्ट विकत घेतल्यास एकरकमी 6,499 रुपये द्यावे लागतील. या किंमतीत इतर कंपन्यांचे अनेक एंट्री लेव्हल स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. परंतु आपला स्मार्टफोन विकत घेणे सोप्पे व्हावे म्हणून रिलायन्स जियोने ईएमआय ऑप्शन्स सादर केले आहेत. ज्यात Always-On plan, Large plan, XL plan and XXL plan अशा चार ईएमआय प्लॅनचा समावेश आहे.  

या ईएमआय किंवा फायनान्स प्लॅन्समध्ये ग्राहकांना सर्वप्रथम 1999 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर एका ठरविक कालावधीसाठी मासिक हप्ता + 501 रुपये ईएमआय प्रोसेसिंग फी फायनान्स कंपनीला द्यावी लागेल. यामुळे बेसिक ईएमआय प्लॅनची किंमत देखील 9,199 रुपये होते.  

ईएमआय प्लॅनची प्रभावी किंमत  

  • Always on plan: सर्वात पहिल्या प्लॅनचे नाव Always On असे आहे. यात हा फोन 18 किंवा 24 महिन्यांच्या EMI वर विकत घेता येईल. 24 महिन्यांचा पर्याय निवडल्यास ग्राहकांना दरमहा 300 रुपये द्यावे लागतील. तर 18 महिन्यांच्या पर्यायात दरमहा 350 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 5GB डेटा आणि 100 मिनिटांचा टॉक टाइम देण्यात येईल. हा डेटा आणि टॉकटाइम ईएमआय संपेपर्यंत मिळेल.  

म्हणजे अगर तुम्ही हे दोन प्लॅन निवडले तर Jio Phone Next ची एकूण किंमत अनुक्रमे: 9700 रुपये आणि 8800 रुपये होईल. (यात EMI + डाउन पेमेंट + 501 रूपये EMI प्रोसेसिंग फीचा समावेश आहे) 

  • Large plan: लार्ज प्लॅनमध्ये देखील दोन पर्याय आहेत. 24 महिन्यांच्या EMI चा पर्याय घेतल्यास प्रत्येक महिन्याला 450 रुपये आणि 18 महिन्यांसाठी 500 रुपये द्यावे लागतील. लार्ज प्लॅनमधील ग्राहकांना ईएमआय संपेपर्यंत डेली 1.5GB डेटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंग मिळेल.  

या दोन प्लॅनमुळे सर्व खर्च जोडून Jio Phone Next ची प्रभावी किंमत अनुक्रमे: 13300 रुपये आणि 11500 रुपये होईल.  

  • XL plan: कंपनीने XL Plan देखील सादर केला आहे. यातील 24 महिन्यांच्या EMI ऑप्शनमध्ये दरमहा 500 रुपये आणि 18 महिन्यांसाठी 550 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंग असे बेनिफिट मिळतील. 

या दोन प्लॅनमध्ये Jio Phone Next ची एकूण किंमत अनुक्रमे: 14500 रुपये आणि 12400 रुपये होईल.  

  • XXL plan: कंपनीने सादर केलेला शेवटचा प्लॅन म्हणजे XXL plan. यात 24 महिन्यांच्या ईएमआयची निवड केल्यास ग्राहकांना 550 रुपये आणि 18 महिने सिलेक्ट केल्यास 600 रुपये दरमहा द्यावे लागतील. या प्लॅनची निवड करणाऱ्या ग्राहकांना देखील डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स मिळतील. ज्यात रोज 2.5GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा समावेश असेल.  

या दोन प्लॅनमध्ये Jio Phone Next ची प्रभावी किंमत क्रमश: 15,700 रुपये आणि 13,300 रुपये होते. यात सर्व EMI, डाउन पेमेंट आणि 501 रुपये EMI प्रोसेसिंग फीचा समावेश करण्यात आला आहे.  

Jio Phone Next Specification  

या फोनमध्ये 5.45-इंचाचा (720 X 1440 पिक्सल) एचडी डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास-3 सह सादर केला जाईल. फोनयामध्ये 2जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल मेमरी मिळेल. ही मेमरी 512जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डनेवाढवता येईल. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 215 चिपसेट मिळेल.  

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. Jio Phone Next मध्ये 3500एमएएचची बॅटरी देण्यात येईल. जियोफोन नेक्स्ट गुगल अँड्रॉइडने बनवलेल्या प्रगती ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. तसेच यात अनेक जियो आणि गुगल अ‍ॅप्स प्रीलोडेड मिळतील.   

हा एक ड्युअल सिम फोन आहे त्यामुळे जियो व्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या सिमचा देखील वापर करता येईल. परंतु एक सिम स्लॉटमध्ये जियो सिम टाकणे बंधनकारक असेल. तसेच डेटा फक्त जियो सिमवरून वापरता येईल. दुसऱ्या सिमचा वापर फक्त कॉलिंगसाठी करता येईल.   

टॅग्स :JioजिओSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान