नवी दिल्ली : भारतातील सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन रिलायन्स जिओ घेऊन येत आहे. येत्या 10 सप्टेंबरला त्याचे बुकिंग सुरु होणार असून हा फोन Google सोबत मिळून Jio बनवत आहे. फिचर फोनवरून स्मार्टफोनवर जाऊ इच्छिनाऱ्यांसाठी किंवा कमी किंमतीत 4जी फो घेणाऱ्यांसाठी JioPhone Next हा पर्याय ठरणार आहे. यामुळे कदाचित प्रत्येक घरात JioPhone पोहोचण्याची शक्यता आहे. (Jio Phone Next Launch on September 10: All You Need to Know)
JioPhone Next ची सामान्य विक्रीशिवाय, कंपनी लोकांना वेगवेगळे पर्याय देऊ इच्छित आहे. यापैकीच एक पर्याय म्हणजे जिओ फोन नेक्स्ट हा 500 रुपयांच प्री-बुक करता येणार आहे. एका रिपोर्टनुसार Reliance Jio फोनच्या विक्रीसाठी वेगवेगळ्या बँकांसोबत टायअप करत आहे. स्टेट बँक, पिरामल कॅपिटल, आयडीएफसी फर्स्ट एश्योर आणि डीएमआय फायनान्स सोबत हे टायअप असेल. JioPhone Next चे पुढील सहा महिन्यांत 50 दशलक्ष फोन विकण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.
दोन मॉडेलJioPhone Next दोन मॉडेलमध्ये असेल. बेसिक मॉडेल हे 5000 रुपयांहून कमी किंमतीत असेल तर JioPhone Next Advance मॉडेल हे 7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत असेल. जे लोक हा फोन खरेदी करू इच्छित आहेत, ते 500 रुपयांची बुकिंग रक्कम देऊ शकतात. ईएमआयवर उरलेली रक्कम द्यावी लागेल. यामध्ये व्याज आकारले जाईल की नाही ते अद्याप समजलेले नाही. Google सीईओ सुंदर पिचाई यांनी JioPhone Next लाँच करण्याची घोषणा केली होती. यामध्ये अँड्रॉईड ११ असणार आहे. यामध्ये 5.5 किंवा 6 इंचाचा डिस्प्ले देण्यात येईल. 3000 ते 4000 एमएएचची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.
दोन जीबी किंवा ३ जीबी रॅम दिली जाईल. 16 जीबी किंवा 32 जीबी स्टोरेज स्पेस दिले जाईल. 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल.