Jio Plan: Jio मध्ये ग्राहकांना अतिशय दर्जेदार प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स मिळतात. प्रीपेड प्लॅन्सची खासियत म्हणजे, तुम्ही कधीही प्लॅनमध्ये बदल करू शकता आणि तुमच्या आवडीचा प्लॅन निवडू शकता. अनेकवेळा नॉर्मल प्रीपेड प्लॅनमध्ये चांगली इंटरनेट स्पीड मिळत नाही. पण, Jioचा असा एक प्लॅन आहे, ज्यात तुम्हाला अतिशय चांगली इंटरनेट स्पीड मिळेल. स्पीडसोबत यात अनेक बेनिफिट्सही देण्यात आले आहेत.
Jioचा 1499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Jioच्या ज्या प्लॅनबद्दल आम्ही सांगत आहोत, त्याची किंमत 1499 रुपये आहे. हा एक प्रीपेड प्लॅन असून, यात तुम्हाला एक लाइफ सायकलची व्हॅलिडिटी मिळते. म्हणजेच तुम्ही 1 महीन्यापर्यंत याचा वापर करू शकता. या प्लॅनमध्ये अनेक बेनिफिट्स आहेत, पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे याची स्पीड. या प्लॅनमध्ये तुम्हाला 300mbps अपलोड आणि 300mbps डाउनलोड स्पीड मिळते. ज्यांना चित्रपट पाहणे किंवा डाउनलोड करण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप फायद्याचा ठरू शकतो. हा प्लॅन थोडा महाग वाटेल, पण ऑफीसची कामे करणाऱ्यांना किंवा ज्यांना हाय इंटरनेट स्पीडची गरज आहे, अशा लोकांसाठी हा प्लॅन उपयुक्त ठरू शकतो.
इतर बेनिफिट्स मिळतातइतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा मिळतो, जो इतर प्लॅनमध्ये सहसा मिळत नाही. यात अनलिमिटेड डाउनलोड करता येईल. अनलिमिटेड डेटासाठी तुम्हाला जास्तीचा चार्ज द्यावा लागणार नाही. याशिवाय, या प्लॅनमध्ये OTT सबस्क्रिप्शन देखील मिळेल. यात डिस्ने प्लस हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमचा समावेश आहे. यात तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ घेऊ शकता.