शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Jio युजर्सना पुन्हा झटका, आता 'या' रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत ३०० रुपयांची वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 14:49 IST

Jio Recharge Plan Price : जिओने प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केले आहेत. हा बदल त्या रिचार्ज प्लॅनमध्ये करण्यात आला आहे, ज्यामध्ये नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन मोफत दिले जात होते. 

Jio Recharge Plan Price : नवी दिल्ली : अलीकडेच जिओनं (Jio) आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. यामुळे युजर्सना बेनिफिट्स मिळवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. दरम्यान, जिओ वेळोवेळी रिचार्ज प्लॅनच्या किंमती बदलत असते. हे प्लॅन यूजर्सना लक्षात घेऊन बदलले जातात. आता पुन्हा एकदा त्यात बदल करण्यात आले आहेत. जिओने प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केले आहेत. हा बदल त्या रिचार्ज प्लॅनमध्ये करण्यात आला आहे, ज्यामध्ये नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन मोफत दिले जात होते. 

रिचार्ज प्लॅनच्या नवीन किमती लाईव्ह झाल्या आहेत आणि त्या जिओ वेबसाइट आणि माय जिओ ॲपवर पाहता येतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स जिओच्या नेटफ्लिक्स प्लॅनची किंमत २०० ते ३०० रुपयांनी वाढवण्यात आली आहे. नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शनसोबत येणाऱ्या रिलायन्स जिओच्या प्रीपेड प्लॅनची किंमत आधी १०९९ रुपये आणि १४९९ रुपये होती. आता जिओ प्रीपेड नेटफ्लिक्स प्लॅनची किंमत १२९९ रुपये आणि १७९९ रुपये झाली आहे. 

अलीकडेच, जिओने टॅरिफ प्लॅनची ​​किंमत वाढवली आहे. आता पुन्हा एकदा त्याची किंमत वाढवण्यात आली आहे. जिओने याच वर्षी जुलैमध्ये आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये सुधारणा केली होती. जिओने रिचार्ज प्लॅनमध्ये १२-२७ टक्क्यांनी वाढ केली आहे. काही प्लॅनमध्ये असे बदल करण्यात आले होते की, यूजर्स अनलिमिटेड ५ जी डेटा वापरू शकत नाहीत. यासोबतच एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लॅनही महाग करण्यात आले आहेत.

जिओने केले होते रिचार्ज प्लॅन महागरिचार्ज प्लॅनच्या किमतीत जवळपास २७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. वार्षिक रिचार्ज प्लॅन देखील २० टक्के करण्यात आला आहे. टॅरिफ प्लॅनमध्ये मिड-रेंज मोबाइल सेवेचाही समावेश करण्यात आला आहे. रिचार्ज महाग झाल्यानंतर युजर्सना मोठा धक्का बसला. या दरवाढीनंतर अनेक युजर्स बीएसएनएलकडे वळले. दरम्यान, एअरटेलनेही जिओसारखाच निर्णय घेऊन रिचार्ज प्लॅन महाग केले होते.

टॅग्स :Jioजिओtechnologyतंत्रज्ञानReliance Jioरिलायन्स जिओ