नवी दिल्ली : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये जिओच्या (Jio) प्लॅन्सचे वर्चस्व आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त आणि महागड्या प्लॅन्सचा समावेश आहे. तुम्ही परवडणारा प्लॅन शोधत असाल, तर तुम्हाला जिओ प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लॅन्स मिळतील. कंपनी 1GB दैनंदिन डेटासह अनेक प्लॅन्स ऑफर करते, जे कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्ससह येतात.
जर तुमची गरज दररोज 1GB डेटा असेल तर कंपनी अतिशय स्वस्त प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये केवळ दैनंदिन डेटाच नाही तर कॉलिंग आणि एसएमएसच्या बेनिफिट्ससह इतरही अनेक सेवा मिळतात. या प्लॅनची किंमत 149 रुपये आहे. या किमतीत दररोज 1GB डेटासह फारच कमी प्लॅन इंडस्ट्रीत आहेत. केवळ डेटाच नाही तर युजर्संना अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्स देखील मिळतात. यामध्ये तुम्हाला 20 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
म्हणजेच संपूर्ण प्लॅनमध्ये एकूण 20GB डेटा मिळेल. FUP लिमिट संपल्यानंतर युजर्सला 64Kbps च्या स्पीडने डेटा मिळेल. दैनंदिन डेटा व्यतिरिक्त, युजर्संना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा मिळते. युजर्स कोणतीही चिंता न करता 20 दिवस कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल करू शकतात. यासोबतच ग्राहकांना दररोज 100 एसएमएसही मिळणार आहेत. संपूर्ण प्लॅनमध्ये एकूण 2000 एसएमएस उपलब्ध असतील. जिओ आपल्या दुसऱ्या प्लॅन्सप्रमाणे यामध्येही कॉम्प्लिमेंट्री अॅप्सचे सबस्क्रिप्शन देत आहे.
युजर्सना Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. म्हणजेच, या प्लॅनमध्ये यूजर्सना डेटा, कॉलिंग आणि एसएमएससोबत एंटरटेनमेंट बेनिफिट्सही मिळतील. या ऑफरसह, 24 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला जिओ प्लॅन 179 रुपयांमध्ये येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला वरील सर्व फायदे मिळतील.