Jio Recharge Plan: TRAI च्या आदेशानंतर सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज पोर्टफोलियोमध्ये वॅलिडिटीवाले प्लान जोडले आहेत. आजवर टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांना २२ किंवा २८ दिवसांच्या वॅलिडिटी ऑफर केली जात होती. पण आता काही प्लानमध्ये ३० आणि ३१ दिवसांच्या वॅलिडिटीची सुविधा देण्यात येत आहे.
जिओच्या पोर्टफोलिओमध्येही एक महिन्यांच्या वॅलिडिटीचे काही प्लान्स उपलब्ध आहेत. याच प्लान्सबाबत माहिती जाणून घेऊयात. इतर टेलिकॉम कंपन्या अजूनही २२ किंवा २८ दिवसांची वॅलिडिटी रिचार्ज प्लानमधून देतात. पण TRAI च्या आदेशानंतर जिओनं आपल्या पोर्टफोलियोमध्ये दोन प्लान जोडले आहेत. यात ग्राहकांना ३० आणि ३१ दिवसांची वॅलिडिटी दिली जाते.
Jio चा २५९ रुपयांचा प्लानजिओच्या २५९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना एका महिन्याची वॅलिडिटी मिळते. म्हणजेच ज्या तारखेला तुम्ही रिचार्ज केला आहे. पुढच्या महिन्याच्या त्याच तारखेपर्यंत तुमचा रिचार्ज प्लान व्हॅलीड राहिल. उदा. यूझरनं समजा १५ तारखेला रिचार्ज केला तर या प्लानची वॅलिडिटी पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत राहिल. मग महिला ३० दिवसांचा असो किंवा ३१ दिवसांचा तुम्हाला संपूर्ण महिन्याची वॅलिडिटी प्राप्त होईल.
या रिचार्जमध्ये कंपनी एका महिन्याच्या वॅलिडिटीसोबतच दरदिवसाला 1.5GB डेटा उपलब्ध करुन देते. डेटासोबतच अनलिमिडेट कॉलिंग आणि दरदिवसाला 100 SMS मिळतात. यात तुम्हाला जिओ अॅपचंही कॉम्प्लिमेंटरी सबस्क्रिब्शन दिलं जातं. युझर्सना Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चं सबस्क्रिब्सन मिळतं.
Jio चा २९६ रुपयांचा प्लानजिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला कोणत्याही मर्यादेशिवाय म्हणजेच अनलिमिटेड डेटा दिला जातो. ३० दिवसांच्या वॅलिडिटीसह उपलब्ध असलेल्या या प्लानमध्ये युझरला 25GB हायस्पीड डेटा मिळतो.
रिचार्ज प्लान अनलिमिडेट कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. या रिचार्ज प्लानमध्ये Jio TV, Jio Cinema सह इतर जिओ अॅप्स देखील वापरता येतात.