Jio Space Fiber : देशातील स्मार्टफोन युजर्सना अतिशय स्वस्त इंटरनेट आणि कॉलिंग सेवा देण्यासाठी मुकेश अंबानी यांनी Jio ची सुरुवात केली. जिओची सुरुवात झाल्यापासून देशातील इंटरनेट क्षेत्रात नवीन क्रांती घडली. जिओनंतर सर्वच सिम कार्ड कंपन्यांनी आपल्या स्वस्त इंटरनेट सेवा लॉन्च केल्या. दरम्यान, जिओने आता एक नवीन तंत्रज्ञान आणले आहे, जे सध्याच्या मोबाइल टॉवर नेटवर्किंगपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे मोबाईल टॉवरची गरज भासणार नाही. या तंत्रज्ञानानंतर इंटरनेट आणि कॉलिंग सेवा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहणार नाही, तर देशातील दुर्गम गावे, पर्वत आणि समुद्रातदेखील कॉलिंग आणि इंटरनेट सेवा उपलब्ध असेल.
काय आहे जिओ स्पेस फायबर?जिओची नवीन मोबाइल सेवा जिओ स्पेस फायबर म्हणून ओळखली जाते, जी जिओने देशातील निवडक ठिकाणी सुरू केली आहे. ही एक सॅटेलाईट आधारित सेवा आहे, ज्यामध्ये रिसीव्हरच्या मदतीने थेट सॅटेलाईटद्वारे इंटरनेट सेवा दिली जाते. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे, रिसीव्हर चालत्या कार किंवा रुग्णवाहिकेवर बसवता येतो. अशा स्थितीत गाडी फिरत असतानाही अतिशय फास्ट इंटरनेट सेवा मिळते. या तंत्रज्ञानाद्वारे सूमारे 1जीबीपीएसची स्पीड मिळू शकेल.
विशेष म्हणजे, अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने यापूर्वीच सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू केली आहे. आता मस्क यांच्या या स्टारलिंकशी स्पर्धा करण्यासाठी Jio ने Jio Space Fiber लॉन्च केले आहे. अद्याप जिओने याच्या किमतीबाबत खुलासा केलेला नाही. मात्र, या नवीन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागात इंटरनेत पोहोचवण्यास मोठी मदत होईल. या तंत्रज्ञानाचा वापर आपत्कालीन स्थितीत करता येईल.
कोणत्या ठिकाणी सेवा लाइव्ह झालीगुजरात - गीर राष्ट्रीय उद्यानछत्तीसगड - कोरबाओरिसा - नबरंगापूरआसाम - ओएनजीसी-जोरहट