JioBharat V3 & V4: दिवाळीपूर्वी Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी भेट आणली आहे. Jio ने इंडिया मोबाईल काँग्रेस (IMC) 2024 मध्ये आपले दोन स्वस्त 4G फोन्स लॉन्च केले आहेत. Jio च्या भारत सीरिजमध्ये लॉन्च केलेल्या V2 4G फोनचे हे अपग्रेडेड मॉडेल्स आहेत. या नवीन JioBharat V3 4G आणि V4 4G फोनमध्ये तुम्हाला UPI पेमेंटचा पर्याय मिळेल. याशिवाय, 450 हून अधिक मोफत लाईव्ह TV चॅनेल्स, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि स्वस्त इंटरनेट डेटाचा लाभ घेता येईल.
किंमत किती?JioBharat V3 आणि V4 ची भारतात किंमत 1,099 रुपयांपासून सुरू होते. कंपनीने सांगितले की, हे फोन लवकरच Amazon, JioMart आणि इतर ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध होतील. युजर्स 123 रुपये प्रति महिना प्रीपेड रिचार्ज प्लॅनद्वारे यावर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 14GB डेटाचा आनंद घेऊ शकतात.
JioBharat V3 आणि V4 चे फीचर्सJioBharat V3 आणि V4 4G फीचर फोन्स, मागील वर्षी लॉन्च केलेल्या JioBharat V2 वर आधारित आहेत. JioBharat V3 हा स्टाईल-केंद्रित पर्याय म्हणून लॉन्च करण्यात आला आहे, तर V4 मॉडेल उपयुक्ततेवर केंद्रित आहे. दोन्ही फोन 1,000mAh बॅटरी, 128GB पर्यंत वाढवता येण्याजोगे स्टोरेज आणि 23 भारतीय भाषांनी सुसज्ज आहेत. या दोन्ही फोन्समध्ये JioTV चा अॅक्सेस मिळतो.