Reliance ने आपल्या यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीतून Jio Phone Next ची घोषणा केली होती. त्याचवेळी हा फोन 10 सप्टेंबरला उपलब्ध होईल असे सांगितले होते. परंतु गेल्या महिन्यात हा फोन उपलब्ध झाला नाही. कंपनीने हा फोन दिवाळीत बाजारात येईल, असे सांगितले होते. आता लाँचच्या आधी हा डिवाइस Google Play कंसोलवर दिसला आहे.
Jio Phone Next टिपस्टर अभिषेक यादवने Play Console वर स्पॉट केला आहे. या लिस्टिंगमधून या फोनच्या काही स्पेक्सची माहिती मिळाली आहे. त्यानुसार हा फोन HD+ म्हणजे 720 x 1440 पिक्सल रिजोल्यूशनसह सादर केला जाईल. तसेच यात क्वॉलकॉमचा Snapdragon 215 मोबाईल प्लॅटफॉर्म दिला जाईल. Jio Phone Next मध्ये 2GB रॅम देण्यात येईल जो अँड्रॉइड 11 गो एडिशनवर चालणाऱ्या फोनसाठी पुरेसा ठरू शकतो.
JioPhone Next Price
घोषणा करताना जियोने हा जगातील सर्वात किफायतशीर 4G फोन असेल असा दावा केला होता. त्यानंतर जागतिक चिप शॉर्टेजमुळे तज्ज्ञांनी या फोनची किंमत वाढू शकते असे सांगितले होते. अनेक रिपोर्ट्समध्ये हा फोन 5000 रुपयांच्या आत येईल असे सांगण्यात आले आहे. परंतु ठोस माहितीसाठी लाँचची वाट बघावी लागेल .
JioPhone Next Specification
आतापर्यत आलेल्या लिक्सनुसार, जियोफोन नेक्स्ट 4G मध्ये 5.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळू शकतो. वर सांगितल्याप्रमाणे हा फोनमध्ये अँड्रॉइड 11 ‘गो’ एडिशनवर चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 215 चिपसेट यात मिळेल. या फोनचे 2जीबी आणि 3 जीबी रॅम तसेच 16जीबी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज असलेले व्हेरिएंट बाजारात येऊ शकतात. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळेल. हा डिवाइस 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. जियोफोन नेक्स्टमध्ये 2,500एमएएच बॅटरी मिळू शकते.