भारतीय जूनपासून JioPhone Next च्या लाँचची वाट बघत आहेत. कंपनीने एजीएममध्ये या फोनची घोषणा केली होती. परंतु आता हा फोन लाँचच्या उंबरठयावर आहे हे निश्चित झाले आहे. कारण गुगलचे सीईओ Sundar Pichai यांनी म्हटले आहे कि भारतात JioPhone Next दिवाळीपर्यंत लाँच होईल. हा स्मार्टफोन भारतात नवीन डिजिटल ट्रांसफॉर्मेशनचा घेऊन येईल असे देखील त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे जियोने या फोनसाठी गुगलसोबत भागेदारी केली आहे.
JioPhone Next फिचर फोन वापरणाऱ्या युजर्सना स्मार्टफोनवर घेऊन येण्यास मदत करेल, असे पिचाई यांनी म्हटले आहे. सुंदर पिचाईने लाँच डेटची माहिती दिली नाही. परंतु याआधी आलेल्या माहितीनुसार हा फोन 4 नोव्हेंबरला विक्रीसाठी येईल.
JioPhone Next Price
घोषणा करताना जियोने हा जगातील सर्वात किफायतशीर 4G फोन असेल असा दावा केला होता. त्यानंतर जागतिक चिप शॉर्टेजमुळे तज्ज्ञांनी या फोनची किंमत वाढू शकते असे सांगितले होते. अनेक रिपोर्ट्समध्ये हा फोन 5000 रुपयांच्या आत येईल असे सांगण्यात आले आहे. परंतु ठोस माहितीसाठी लाँचची वाट बघावी लागेल .
JioPhone Next Specification
आतापर्यत आलेल्या लिक्सनुसार, जियोफोन नेक्स्ट 4G मध्ये 5.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळू शकतो. वर सांगितल्याप्रमाणे हा फोनमध्ये अँड्रॉइड 11 ‘गो’ एडिशनवर चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 215 चिपसेट यात मिळेल. या फोनचे 2जीबी आणि 3 जीबी रॅम तसेच 16जीबी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज असलेले व्हेरिएंट बाजारात येऊ शकतात. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळेल. हा डिवाइस 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. जियोफोन नेक्स्टमध्ये 2,500एमएएच बॅटरी मिळू शकते.