नवी दिल्ली : रिलायन्स जिओने नुकतीच नवीन वर्षाची 2020 ऑफर बंद केली होती. यामध्ये कंपनी 2199 रुपयांचा वार्षिक मुदतीचा प्लॅन 2020 रुपयांमध्ये देत होती. ही कमी कालावधीसाठी ऑफर ठेवलेली होती. मात्र, आज जिओने दीर्घ मुदतीचा नवीन प्लॅन जाहीर केला आहे. या प्लॅनचे फायदे 2020 सारखेच आहेत. मात्र, मुदत घटविण्यात आली आहे.
एअरटेल आणि व्होडाफोनचे १२ महिन्यांचे प्लॅन अनुक्रमे 2398 आणि 2399 रुपयांचे आहेत. याला टक्कर देण्यासाठी जिओने 2121 रुपयांत 336 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला प्लॅन जाहीर केला आहे. या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि नॉन जिओ नेटवर्कवर बोलण्यासाठी 12000 मिनिटे देण्यात येत आहेत. तसेच प्रतिदिन 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस देण्यात येत आहेत. 336 दिवसांची व्हॅलिडिटी असल्याने एकूण 505 जीबी डेटा मिळणार आहे. 1.5 जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 केबीपीएस होणार आहे. यामध्ये जीओ टीव्ही आणि जिओ सिनेमा अॅप मोफत मिळणार आहे.
तर Airtel 2,398 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. हा मोठा फरक जिओच्या प्लॅनमध्ये आहे. याशिवाय प्रतिदिन 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळणार आहे. याची वैधता 365 दिवसांची आहे. यानुसार 547.5 जीबी डेटा मिळतो. यामध्ये Free Hellotunes, Airtel Xstream App Premium, Zee5, 4 आठवड्यांचा शॉ अकादमी कोर्स, फास्टटॅगवर 150 रुपयांचा कॅशबॅक, Wynk Music आणि अँटीव्हायरस सुविधा दिली जाणार आहे.
तर Vodafone 2,399 च्या प्लॅनमध्येही युजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. याशिवाय प्रतिदिन 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळणार आहे. याची वैधता 365 दिवसांची आहे. यानुसार 547.5 जीबी डेटा मिळतो. यामध्ये Vodafone Play Subscription सुविधा देण्यात आली आहे.