शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Jio True 5G Service : दिवाळीपासून मिळणार जिओची 5G स्पीड, असा घेता येईल Welcome Offer चा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 2:53 PM

जिओची 5G टेक्नॉलॉजी 700MHz बँडवर अवलंबून आहे आणि ही भारतात SA (स्टँडअलोन) 5G सेवा देणारी एकमेव कंपनी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

भारतातील सर्वात मोठी सब्सक्रायबर बेस असलेली टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने काही निवडक शहरांमध्ये दिवाळीपासून 5G सेवा मिळायला सुरुवात होईल, अशी घोषणा केली आहे. Jio True 5G लॉन्चसोबतच कंपनी 5G नेटवर्कवर ग्राहकांना 1Gbps पर्यंतची स्पीड देणार आहे. जर आपली इतरांच्या आधी जिओच्या 5G स्पीडचा फायदा घेण्याची इच्छा असेल तर याच्या वेलकम ऑफरचा फायदा घेऊ शकता.

जिओची 5G टेक्नॉलॉजी 700MHz बँडवर अवलंबून आहे आणि ही भारतात SA (स्टँडअलोन) 5G सेवा देणारी एकमेव कंपनी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जिओने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5Gची टेस्टिंग सुरू केले आहे. मात्र, आपण या शहरांमध्ये राहत असाल तरीही आपल्याला या सेवेचा लाभ घेण्यासाठी एका विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागेल. अर्थात या सेवेचा लाभ अपोआप मिळणार नाही.

सध्या इन्व्हाइट-ओनली आहे जिओची 5G सेवा -रिलायन्स जिओची 5G सेवा काही निवडक शहरांमध्ये इन्व्हाइट-ओनली मोडमध्ये मिळेल. अर्थात आपल्याला 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी एका इन्व्हाइटची आवश्कता असेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपण वरील चार शहरांपैकी एका शहरात असणे आवश्यक आहे. याच बरोबर आपल्याकडे 5G-एनेबल्स स्मार्टफोन असणेही आवश्यक आहे. यानंतर, रियलमी, वनप्लस, व्हीवो, सॅमसंग, शाओमी आणि iQOO फोन यूजर्स वेलकम ऑफरचा भाग बनण्याचा प्रयत्न करू शकतात. 

आपल्याला सर्वप्रथम 5G फोनमध्ये MyJio App इंस्टॉल करावे लागेल. येथे अॅप ओपोन केल्यानंतर आणि आपल्या जिओ नंबरच्या सहाय्याने लॉगिन केल्यानंतर, आपल्याला होम-स्क्रीन दिसेल. जर आपण जिओची 5G सेवा टेस्ट सुरू असलेल्या शहरात राहत असाल तर आपल्याला सर्वात वर 'Jio Welcome Offer' लिहिलेले दिसेल. या कार्डवर टॅप केल्यानंतर आपल्याला 5G सेवेचा लाभ घेता येईल आणि आपल्याला एनरोल करण्यात येईल.

स्क्रीनवर दाखवला जाईल कन्फर्मेशन मेसेज -टॉप कार्डवर टॅप केल्यानंतर, स्क्रीनवर मेसेज दिसेल. "धन्यवाद! जिओ ट्रू 5G सोबतचा आपला प्रवास सुरू होत आहे." खरे तर, जर यूजरचा मोबाईल 5G कंपेटिबल असेल आणि जिओच्या 5G बँड्सला सपोर्ट करत असले तर त्याला 'जिओ वेलकम ऑफरचे इन्व्हाइट पाठवले जाईल.' हे इन्व्हिटेशन मिळाल्यानंतरच 5G इंटरनेट स्पीड्सचा फायदा मिळायला सुरुवात हेईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Jioजिओ5G५जीReliance Jioरिलायन्स जिओ