मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील Jio लवकरच भारतीय बाजारात नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स या महिन्याच्या शेवटी वार्षिक एजीएम कार्यक्रम आयोजित करू शकते. तत्पूर्वी माहिती मिळतेय की, जिओ दोन नवीन फोनवर काम करत आहे. या स्वस्त 5G फोनमध्ये मोठी स्क्रीन, उत्तम कॅमेरा आणि दमदार बॅटरी मिळू शकते.
नवीन 5G जिओ फोन28 ऑगस्ट रोजी कंपनी एजीएम कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी Jio फोनबद्दल अनेक लीक आणि माहिती समोर आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, JBV161W1 आणि JBV162W1 या दोन मॉडेल्सवर काम सुरू आहे. दरम्यान, या फोनच्या किमतीबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
यापूर्वी Jio Phone 5G ची इमेज लीक झाली होती, हा फोन त्यापैकी एक असू शकतो. हा भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन देखील असू शकतो. लीक्सवर विश्वास ठेवला तर, फोनला HD+ रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा डिस्प्ले मिळेल. हा फोन Qualcomm Snapdragon 480 SoC वर चालेल. यात 4GB रॅम आणि 32GB स्टोरेज असेल. फोनला ड्युअल कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये 13MP प्रायमरी सेन्सर आणि 8MP सेल्फी कॅमेरा असेल.