काही दिवसापासून जगभरात मंदीचे सावट असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभमिवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक या दोन कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढल्याचे समोर आले आहे. आता भारताताही याचे सावट दिसत आहे. भारतीय सोशल मीडिया अॅप ShareChat ने आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. इतकंच नाही तर कंपनीने आपला फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म Jeet11 देखील बंद केला आहे.
मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड शेअरचॅट चालवते. या कंपनीला निधी देणाऱ्यांमध्ये गुगल, ट्विटर, स्नॅप आणि टायगर ग्लोबल सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.
शेअरचॅटच्या कर्मचाऱ्यांची संख्या 2300 आहे आणि या कपातीमध्ये सुमारे 100 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे.
शेअरचॅट कंपनीने Jeet11 प्लॅटफॉर्म बंद केले आहे. तसेच इतर काही विभाग बंद करण्यात आले आहेत. म्हणूनच या टीममधील लोकांचा शेअरचॅट टीममध्ये समावेश केला जाईल. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना बाहेर जावे लागणार आहे, असं कंपनीने सांगितले आहे. नियमित उपक्रमांतर्गत घेतलेला हा निर्णय असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. याचा परिणाम कंपनीच्या 5 टक्क्यांहून कमी कर्मचाऱ्यांवर होणार आहे.
देसी जुगाड! 'या' तरुणाने बनवली ६ सीटर इलेक्ट्रिक बाईक, एव्हरेज पाहून आनंद महिंद्रा झाले इम्प्रेस
Sharechat ही भारतातील सर्वात लोकप्रिय देशांतर्गत सोशल मीडिया कंपनी आहे. त्याच्या सर्व प्लॅटफॉर्मवर 400 मिलियन सक्रिय वापरकर्ते आहेत. 2015 मध्ये अंकुश सचदेवाने भानू प्रताप सिंग आणि फरीद एहसान यांच्यासोबत याची सुरुवात केली होती. शेअरचॅट व्यतिरिक्त, या पोर्टफोलिओमध्ये Moj नावाचे एक प्लॅटफॉर्म देखील आहे.
कंपनीच्या शेअरचॅट अॅपच्या महिन्याला सक्रिय वापरकर्त्यांची संख्या सुमारे 180 मिलियन आहे, तर मौज अॅपवर 300 मिलियनहून अधिक वापरकर्ते सक्रिय आहेत.