आपण सध्याच्या काळात कुठेही गेलो तरी बायोमॅट्रिकचा हमखास वापर होताना दिसून येतो. प्रचंड लोकसंख्येत स्वतःची ओळख कळण्यासाठी बायोमॅट्रिकचा वापर केला जातो. एखाद्या व्यक्तीची भौतिक जगात व्यावाहारीक ओळख असण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. तसंच कोणत्याही क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी बायोमॅट्रिकचा वापर केला जातो. यात एखाद्या व्यक्तीच्या हातांच्या बोटांचे निशाण, रेटिना, स्किन किंवा आवाज यांचा समावेश असतो. पण सुरक्षेच्या मुद्द्यावरून आत्तापर्यंत अनेकदा बायोमॅट्रिक टेक्नॉलॉजीवर आधारीत सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.
सुरक्षेसाठी बायोमॅट्रिकचा वापर
बायोमॅट्रिकचा वापर हा इतर तंत्रज्ञानाच्या पध्दतीत सगळ्यात सुरक्षित आहे. कारण पासवर्ड चोरी होण्याच्या तुलनेत बायोमॅट्रिकचे हॅकिंग करणे अवघड आहे. कोणाचाही डोळा चुकवून हॅकिंग करणं ही सहज शक्य होणारी गोष्ट नाही. बनावट ओळख तयार करणं अवघड असतं कारण यूजर्सच्या डेटाची गरज असते.
बायोमॅट्रिकचा वापर कुठे केला जातो.
एक्सपोर्ट सिक्यूरिटी- मोठमोठ्या इंटरनॅशेनल एअरपोर्टसवर प्रवाश्यांची माहीती मिळवण्याकरीता किंवा सत्य पडताळणी करण्याकरिता बायोमॅट्रिकचा वापर होतो.
अटेंडंस लावण्यासाठी - अनेक प्रायवेट तसंच सरकारी ऑफिसमध्ये कंपनीच्या कर्मचारी वर्गाच्या हजेरीची नोंद घेण्यासाठी बायोमॅट्रिकचा वापर केला जातो.
कायद्याचे काम- एखाद्या कैद्याची ओळख पटण्याकरिता, त्यांचे फिंगरप्रिंट्स आणि डीएनए डेटा बेसचा वापर करून कामकाज केले जाते.
अॅक्सेस कंट्रोल- एखाद्या अनोळखी, व्यक्तीला घरात प्रवेश करण्यापासून तसंच मोबाईल वापरण्यापासून किंवा आपल्या वाहनात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी बायोमॅट्रिकचा वापर फायदेशीर ठरतो.
बँकिंग- अनेकदा सारखी नावं बँकेतल्या खातेधारकांची असल्यामुळे फ्रॉड होण्याचा धोका असतो. त्यामुळे जर बँकेत बायोमॅट्रिक सिस्टिम असेल तर सुरक्षित असतं. डेटा सिक्युरिटी म्हणजे बायोमॅट्रिकवरून डेटा स्टोअर केला जातो.