शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

Gmail इनबॉक्समधील नको असलेले ईमेल होणार ऑटोमॅटीक डिलीट, जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 10:44 AM

सध्याच्या टेक्नॉलॉजी आणि डिजिटल मार्केटिंगच्या युगात युजर्सना अनेक प्रमोशनल ईमेल हे सातत्याने येत असतात. Gmail इनबॉक्समधील नको असलेल्या ईमेल्सची संख्या ही वाढत असते.

ठळक मुद्देGmail आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. टेक्नॉलॉजी आणि डिजिटल मार्केटिंगच्या युगात युजर्सना अनेक प्रमोशनल ईमेल हे येतात. नको असलेले ईमेल ऑटोमॅटीक डिलीट करता येतात.

नवी दिल्ली - Gmail आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. जीमेलमध्ये असेलल्या फीचरमुळे अनेक कामं सोपी होतात. जीमेलच्या अनेक फीचरची सर्वसामान्यांना माहिती नाही. अनेकजण केवळे ईमेल, अटॅचमेंट पाठवण्यासाठी आणि रिसीव्ह करण्यासाठी फक्त जीमेलचा वापर करतात. सध्याच्या टेक्नॉलॉजी आणि डिजिटल मार्केटिंगच्या युगात युजर्सना अनेक प्रमोशनल ईमेल हे सातत्याने येत असतात. 

Gmail इनबॉक्समधील नको असलेल्या ईमेल्सची संख्या ही वाढत असते. अशाप्रकाचे प्रमोशनल ईमेल डिलीट केले नाहीत तर इनबॉक्स नको असलेल्या ईमेल्सनेच पूर्ण भरून जातो.  नको असलेले ईमेल ऑटोमॅटीक डिलीट करता येतात. ते कसे डिलीट करायचं हे जाणून घेऊया. 

- सर्वप्रथम emailstidio.pro वरून जीमेल अकाऊंटमध्ये 'Email Studio' हे इन्स्टॉल करा. 

- इन्स्टॉल झाल्यानंतर जीमेल अकाउंटमध्ये जाऊन इनबॉक्समधील कोणताही एक मेसेज ओपन करा. 

- तेथे देण्यात आलेल्या ईमेल स्टुडिओ आयकॉनवर क्लिक करा. 

- आपल्या जीमेल आयडी आणि पासवर्डवरून लॉग इन करा. 

- लॉग इन केल्यानंतर लिस्टमध्ये देण्यात आलेल्या 'ईमेल क्लीनअप' पर्यायावर टॅप करा. 

- जीमेलमध्ये जो टास्क करायचा आहे त्यासाठी अ‍ॅड न्यू रूलवर क्लिक करा. 

- येथे नवीन नियमाप्रमाणे एखाद्या खास ईमेल आयडीला मार्क करू शकता. 

- या प्रोसेसने जीमेलला एखाद्या खास ईमेल आयडीवरून एका महिन्यात आलेले सर्व ईमेल्स डिलीट करण्याची कमांड देता येते. 

- ही प्रोसेस झाल्यावर सेव्ह बटणावर क्लिक करा. त्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये ईमेल स्टुडिओ लाँच होईल. 

- जीमेल युजर्सने सेट केलेले नियम अपल्य करतं. त्यानुसार निवडण्यात आलेल्या ईमेल अ‍ॅड्रेस वरून येणारे मेसेज ऑटोमॅटीक डिलीट करतं. 

तुमचं Gmail अकाऊंट किती ठिकाणी आहे लॉग इन, असं करा चेक गुगलचं लोकप्रिय अ‍ॅप जीमेलचा रोज वापर केला जातो. वैयक्तिक आणि ऑफिसच्या कामकाजासाठी जीमेलचा वापर केला जातो. तसेच फोन आणि लॅपटॉपवर कनेक्ट असलेलं जीमेल हे एक अ‍ॅप आहे. अनेकदा जीमेलच्या व्हेरिफिकेशन कोडसाठी ईमेल पाठवला जातो अशा वेळी अन्य कोणी आपलं जीमेल अकाऊंट हॅक केलं तर अशी भीती वाटते. 

Gmail वर भलत्याच व्यक्तीला गेलेला ई-मेल असा घ्या परतफेसबुक अथवा WhatsApp वर एखादा मेसेज चुकून सेंड केला तर तो डिलीट करण्याची सोय असते. मात्र जीमेलवर चुकून पाठवलेला ईमेल डिलीट कसा करायचा हे अनेकांना माहीत नाही. Gmail वर देखील ही सोय देण्यात आली आहे. पाठवलेला मेल कसा परत घ्यायचा हे जाणून घेऊया. सर्वप्रथम स्मार्टफोन किंवा संगणकावर आपलं जीमेल अकाऊंट ओपन करा. लॉग इन केल्यानंतर अकाऊंटच्या वर उजव्या बाजूला कॉर्नरमध्ये आपल्या प्रोफाईल फोटो खाली काही मेन्यू देण्यात आलेले दिसतील. त्या मेन्यूवर क्लिक करून सेटींग ऑप्शनमध्ये जा. ‘Undo Send’ चा एक पर्याय दिसेल. त्याच्यासमोर असलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करून ‘Undo Send’ फीचर अनेबल करा. फीचरच्या खाली ‘Send cancellation period’ नावाचा एक पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करून Send cancellation period मध्ये टाईम (5-30) सेकंदामध्ये सिलेक्ट करा. सेटींगमध्ये बदल केल्यानंतर खाली ते सेव्ह करा. त्यानंतर तुमच्या जीमेलमध्ये ‘Undo Send’ फीचर अनेबल होईल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जेव्हा ईमेल पाठवला जाईल तेव्हा तो काही सेकंदासाठी सेव्ह होतो. तसेच स्क्रिनवर मेल पाठवल्यानंतर तो ईमेल Undo करण्यासाठी एक मेसेज दिसेल.

Gmail मध्ये वापरा कॅलेंडर, नोट्स आणि टास्क लिस्टसारखे अ‍ॅपगुगल आपल्या युजर्सना कॅलेंडर चेक करण्यासाठी, नोट्स तयार करण्यासाठी G-Suite अ‍ॅपशिवाय तसेच मेल टॅब न सोडता मेलचा वापर करण्याची संधी दिली आहे. Gmail मध्ये वापरा कॅलेंडर, नोट्स आणि टास्क लिस्टसारखे अ‍ॅप वापरता येणार आहेत. यासाठी स्टेप्स जाणून घेऊया. सर्वप्रथम आपल्या डेस्कटॉपच्या ब्राऊजरवर जीमेल ओपन करा. ओपन केल्यावर अ‍ॅप्सचं आयकॉन बटण दिसतं की नाही ते पाहा. जर आयकॉन बटण दिसत नसेल तर खालच्या दिशेला उजव्या कोपऱ्यात 'Show side panel' चा अ‍ॅरो दिसेल. त्यावर क्लिक केल्यास आयकॉन दिसतील. कॅलेंडर, नोट्स, टास्क आणि इतर अ‍ॅपवर क्लिक करून या पेजवर युजर्स त्याचा अ‍ॅक्सेस घेऊ शकतात. सर्वात शेवटी देण्यात आलेल्या '+' आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर इतरही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही जोडू शकता. यावर क्लिक केल्यावर जी-स्वीट मार्केटप्लेस ओपन होईल. येथून ऑन्स डाऊनलोड केले जाऊ शकतात. सध्या हे साईड पॅनल जीमेलच्या अँड्रॉईड किंवा आयओएस अ‍ॅप्सवर दिसणार नाही. यासाठी स्मार्टफोनमध्ये मल्टी-स्क्रिन फीचरचा वापर करणं गरजेचं आहे. याच्यामुळे एकाचवेळी एकापेक्षा अधिक अ‍ॅप्सचा वापर करता येतो.

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानgoogleगुगल