नवी दिल्ली - प्रवास करताना लोकेशन समजण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला जातो. याच्या मदतीने रस्त्याची माहिती मिळते त्यामुळेच प्रवास करताना अडचण येत नाही. मात्र गुगल मॅपचा वापर करण्यासाठी फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असणं अत्यंत गरजेचं असतं. पण सर्वच ठिकाणी इंटरनेटची सर्व्हिस चांगली असतेच असं नाही. त्यामुळे तेथे गुगल मॅपचा वापर करताना काही समस्यांचा सामना करावा लागतो.
गुगल मॅपसंबंधीत असलेल्या या समस्येपासून बचाव करण्यासाठी गुगलने आपल्या युजर्सना अॅपमध्ये एक सुविधा दिली आहे. त्या सुविधेमुळे युजर्स गुगल मॅप्सचा ऑफलाईन देखील वापर करू शकतात. कोणत्याही भागामध्ये जाऊन या अॅपच्या माध्यमातून मॅप डाऊनलोड करता येतो. म्हणजेच इंटरनेटशिवाय देखील या अॅपचा वापर करता येतो.
अँन्ड्रॉईड डिव्हाईससाठी ऑफलाईन मॅप असा करा डाऊनलोड
- अँन्ड्रॉईड फोन अथवा टॅबलेटवर गुगल मॅप हा अॅप डाऊनलोड करा.
- इंटरनेट कनेक्ट असताना गुगल मॅपमध्ये साइन-इन करा.
- ज्या ठिकाणी जायचे आहे ते ठिकाण सर्च करा.
- ठिकाण सर्च केल्यानंतर डाऊनलोड ऑफलाईन मॅपवर टॅप करा.
iOS वर ऑफलाईन मॅप असा करा डाऊनलोड
- iPhone अथवा iPad वर गुगल मॅप हे अॅप ओपन करा.
- इंटरनेट कनेक्ट असताना गुगल मॅपमध्ये साइन-इन करा.
- ज्या ठिकाणी जायचे आहे ते लोकेशन सर्च करा आणि More वर टॅप करा.
- त्यानंतर Download offline Map सिलेक्ट करा.
ऑफलाईन मॅप डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेट कनेक्शन नसल्यास अथवा स्लो झाल्यास याचा वापर करता येतो. या सुविधेमुळे डाऊनलोड केलेल्या मॅपचा वापर करता येणार आहे.
गुगल मॅपचे हायवेसाठी महत्वाचे फिचर; जाणून घ्या कसा कराल वापर...
एखादे ठिकाण शोधायला किंवा रस्ता दाखविण्याचे काम गुगल मॅप चांगल्या पद्धतीने करतो. वाहतूक कोंडी, एकेरी वाहतूक, शहरात फ्लायओव्हरवर जायचे की सर्व्हिस रोडने जायचे याचे मार्गदर्शन केल्याने नवख्या व्यक्तीलाही वाहन मार्गक्रमण करणे सोपे जाते. आता आणखी एक महत्वाचे फिचर गुगल मॅपमध्ये येणार आहे. ते म्हणजे Speed Limits.
देशभरात लाखो किमींचे महामार्गांचे जाळे पसरलेले आहे. या प्रत्येक हायवेची वेग मर्यादा ही निश्चित केलेली असते. त्या पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्यास वाहतूक पोलिस चलन फाडू शकतात. यापेक्षा महत्वाचे म्हणजे टायर फुटणे, वेगावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होतात. भारतीय रस्ते हे जास्तीतजास्त 80 किमीच्या वेगाने जाण्यासाठी बनविलेले असतात. मात्र, सध्याची वाहने ही 120 ते 180 किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने धावू शकतात. यावर आळा घालण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी गुगलने हे फिचर आणले आहे. Google Maps च्या आयओएस आणि अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर हे फिचर लाँच होणार आहे. हे फिचर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांबरोबरच दृतगती महामार्गांवरही उपयोगाचे ठरणार आहे.
Google Map वरून आता ऑटो रिक्षाच्या रुटसोबतच भाडेही कळणार
गुगलने आपल्या गुगल मॅप या अॅपमध्ये एक नवीन फीचर आणण्याची घोषणा केली आहे. सोमवारी (17 डिसेंबर 2018) गुगलने ही घोषणा केली आहे. दिल्लीकरांना आता या फीचरमुळे टॅक्सी, कॅब आणि ओलाप्रमाणे 'पब्लिक ट्रान्सपोर्ट' मोडमध्ये गुगल मॅप अॅपवर ऑटो-रिक्षाचाही पर्याय दिसणार आहे. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गुगल मॅप अॅपवरून प्रवाशांना कुठपर्यंत जायचंय या माहितीसोबतच मार्ग (रुट) आणि ऑटो-रिक्षाचे भाडे किती होणार आहे?, हे समजणार आहे. या नवीन अॅप फीचरमुळे दिल्लीकरांचा प्रवास आणखी सोयीचा आणि सुखकारक होईल, असे गुगलने म्हटले आहे. गुगलचे हे नवीन फीचर गुगल मॅपमधील पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि कॅबवर पाहता येवू शकणार आहे. तसेच दिल्लीतील तज्ज्ञ आणि दिल्ली ट्रॅफीक पोलिसांकडून रस्त्यांची सर्व माहिती मिळवून हे फीचर तयार करण्यात आल्याचे गुगलने सांगितले.