नवी दिल्ली - फेसबुक जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. जगभरातील कोट्यवधी युजर्स रोज फेसबुकचा वापर करतात. फेसबुकमध्ये काही सीक्रेट ट्रिक्स आहेत. मात्र कमी लोकांना त्याबाबत माहिती आहे. या ट्रिक्सच्या मदतीने फेसबुकवरील चॅटिंग आणखी मजेशीर करता येतं.
जास्त पोस्ट करणाऱ्या फ्रेंडला स्नूज करा
फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमध्ये अशी एक व्यक्ती असते की ती सतत फेसबुकवर पोस्ट शेअर करत असते. मात्र नेहमीच त्या व्यक्तीच्या पोस्ट पाहून कंटाळा येतो. पण मित्र असल्याने अनफ्रेंड करता येत नाही. अशा युजर्ससाठी स्नूजचा पर्याय बेस्ट आहे. याच्या मदतीने फेसबुकवर जास्त पोस्ट करणाऱ्या फ्रेंडला स्नूज करता येतं.
बर्थडे नोटिफिकेशन्स बंद करा
फेसबुकवर बर्थडे नोटिफिकेशन्स मिळतं. त्यामुळेचं मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांचा वाढदिवस हा लक्षात राहतो. फ्रेंडलिस्टमध्ये आज कोणत्या व्यक्तीचा वाढदिवस आहे याची माहिती फेसबुक युजर्सना देत असतं. मात्र अनेकदा नको असलेल्या व्यक्तीच्या वाढदिवसाचं देखील नोटिफिकेश येतं. फेसबुकवर हे फीचर बाय डिफॉल्ट ऑन असतं. त्यामुळे नको असल्यास सेटिंग्समध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑप्शनमध्ये बर्थडे नोटिफिकेशन टर्न ऑफ करा.
फेसबुक डेटा डाऊनलोड करा
फेसबुक युजर्सना त्यांचा पूर्ण डेटा हा डाऊनलोड करता येतो. डाऊनलोड करण्यासाठी सेटिंगमध्ये गेल्यावर Your Facebook Information चा पर्याय मिळेल. यावर क्लिक केल्यास Download Your Information चा एक पर्या मिळेल. त्यावरून युजर्स सर्व डेटा डाऊनलोड करू शकतात.
अॅप इन्वाइट्स आणि गेम रिक्वेस्ट बंद करा
फेसबुकवर रोज नवीन अॅप इन्वाइट्स आणि गेम रिक्वेस्ट येत असतात. या रिक्वेस्टचा कंटाळा आला असेल तर ते युजर्स बंद करू शकतात. सेटिंगमध्ये ब्लॉकिंग ऑप्शनवर क्लिक करा. खाली स्क्रोल केल्यानंतर ब्लॉक अॅप इन्व्हाईटचा पर्याय मिळेल.
फेसबुक मेसेजवर Seen बंद करा
चॅटिंग करत असताना समोरच्या व्यक्तीला तुम्ही चॅट अथवा मेसेज वाचला हे समजू नये असं वाटत असेल तर त्यांना फेसबुकने एक पर्याय दिला आहे. यासाठी युजर्सना Unseen for Facebook Chrome extension डाऊनलोड करावं लागेल. हे इन्स्टॉल केल्यानंतर ब्राऊजर टूल बारमध्ये देण्यात आलेल्या मेसेंजर आयकॉनवर टॅप करा आणि ते ऑन करा.
ऑनलाईन स्टेटस इतरांपासून लपवा
फेसबुकवर एक खास फीचर आहे ज्याच्या मदतीने काही लोकांपासून ऑनलाईन स्टेटस ब्लॉक करण्यासोबतच त्यांचे मेसेजही ब्लॉक करता येतात. यासाठी सेटिंग्समध्ये देण्यात आलेल्या ब्लॉकिंग ऑप्शनमध्ये जा. ब्लॉक युजर्सचा एक सेक्शन मिळेल. ज्या व्यक्तीला ब्लॉक करायचं आहे त्यांचं नाव टाईप करा.