WhatsApp भारतातील लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. हे अॅप इतकं वापरलं जात की इन्स्टंट मेसेजिंगसाठी ‘व्हॉट्सअॅप कर’ हा पर्यायी शब्द झाला आहे. या अॅपवर दोन लोकांनामध्ये कोणता संवाद साधला जातो याची माहिती कंपनीला मिळत नाही. परंतु तुम्ही कोणाशी सर्वाधिक बोलता याची माहिती मिळवता येते. यासाठी तुम्हाला एक ट्रिक वापरावी लागेल.
या ट्रिकचा वापर करून तुम्ही कोणाच्याही व्हॉट्सअॅपवरील सर्वात जास्त चॅटिंग केलेल्या कॉन्टॅक्टची माहिती मिळवू शकता. मग व्यक्ती तुमची पार्टनर असो किंवा गुपचूप मोबाईलकडे बघून हसणारा मित्र किंवा मैत्रीण असो. या ट्रिकसाठी तुम्हाला त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस मिळणं आवश्यक आहे. तसेच व्हॉट्सअॅप लॉकची माहिती असणं देखील आवश्यक आहे.
असं जाणून घ्या Whatsapp वर सर्वाधिक संपर्कात असलेल्या कॉन्टॅक्टची माहिती
- सर्वप्रथम व्हॉट्सअॅप ओपन करा.
- मेन पेजवर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा.
- त्यानंतर सेटिंग्समध्ये जा.
- सेटिंगमध्ये स्टोरेज अँड डेटावर क्लिक करा.
- इथे मॅनेज स्टोरेजवर क्लिक करा.
- क्लिक केल्यांनतर तुम्हाला सर्वाधिक डेटा शेयर केलेल्या कॉन्टॅक्ट्सची संपूर्ण यादी दिसेल.
हे देखील वाचा: