दिवाळीच्या निम्मिताने Kodak ने दोन नवीन Smart TV मॉडेल्स सादर केले आहेत. कंपनीने CA Pro Smart TV सीरिज अंतर्गत 43 इंच आणि 50 इंचाचे दोन मॉडेल बाजारात आणले आहेत. हे दोन्ही मॉडेल डॉल्बी ऑडियोला सपोर्ट करतात. त्यामुळे सिनेमा थिएटरसारखा अनुभव घर बसल्या मिळतो. कोडॅकने ही सिरीज फ्लिपकार्टवर उपलब्ध केली आहे.
Kodak CA Pro Smart TV Price In India
Kodak CA Pro Smart TV च्या 43 इंचाच्या मॉडेलची किंमत 27,999 रुपये आहे. तर 50 इंचाच्या मॉडेलसाठी 33,999 रुपये मोजावे लागतील. ही स्मार्ट टीव्ही सीरिज विक्री फ्लिपकार्टवरून 28 ऑक्टोबरपासून विकत घेता येईल. परंतु अर्ली अॅक्सेस मेंबर्स मात्र आजपासून हे स्मार्टटीव्ही ऑर्डर करू शकतात.
Kodak CA Pro Smart TV चे स्पेसिफिकेशन
या स्मार्टटीव्ही सीरिजमध्ये गुगलचे क्रोमकास्ट, गुगल क्लासरूम आणि यूट्यूब सारखे अॅप्स बिल्ट-इन देण्यात आले आहेत. त्यामुळे वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लाससाठी या टीव्हीचा उपयोग होऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी ARM Cortex A53 SoC चा वापर केला आहे. ही सीरिज अँड्रॉइड टीव्ही 10 ओएसवर चालते.
या स्मार्ट टीव्हीमधील 40W आऊटपुट देणारे स्पिकर्स दमदार साऊंड क्वॉलिटी देतात. त्याचबरोबर या टीव्ही मध्ये Dolby MS12 आणि DTS TruSurround सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी टीव्ही मध्ये HDMI 3 पोर्ट, यूएसबी 2.0 पोर्ट, ड्युअल बँड वायफाय आणि ब्लूटूथ 5.0 मिळतं.
ही एक अँड्रॉइड टीव्ही असल्यामुळे यावर प्ले स्टोरमधील 6000 पेक्षा अॅप्स वापरता येतात. तसेच या टीव्हीच्या रिमोटमध्ये गुगल प्ले स्टोर, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि नेटफ्लिक्ससाठी डेडिकेटेड बटन्स देण्यात आले आहेत.