नवी दिल्ली : ट्विटरला टक्कर देणाऱ्या भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने कू अॅपने (Koo App) आज मोठी घोषणा केली आहे. कू अॅपने कू प्रीमियम (Koo Premium) लाँच केले आहे. हे अपडेट खासकरून क्रिएटर्ससाठी आहे, ज्याद्वारे क्रिएटर्सला आपल्या फॉलोवर्सशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होण्यास आणि आपल्या कंटेंटवर कमाई करण्याची संधी मिळत आहे.
कू प्रीमियम प्लॅटफॉर्मवरील लाखो कंटेंट क्रिएटर्सला आपल्या सब्सक्रायबर्ससोबत एक्सक्लुझिव्ह कंटेंट शेअर करून आणखी पैसे कमविण्याची संधी देत आहे. कू प्रीमियमसह क्रिएटर्सजवळ एक ठराविक साप्ताहिक/मासिक शुल्कासाठी आपल्या सब्सक्रायबर्ससोबत एक्सक्लुझिव्ह कंटेंट शेअर करण्याचा पर्याय आहे.
क्रिएटर्स टेक्स्ट, व्हिडिओ आणि फोटोंना प्रीमियम म्हणून लेबल करू शकतील आणि ते आपल्या सब्सक्रायबर्ससोबत शेअर करू शकतील, ज्यामुळे प्रीमियम कंटेंट पोस्ट करण्यासोबत कमाई करण्याचा हा सर्वात सोपा प्लॅटफॉर्म आहे. सध्या हे अपडेट फक्त भारतातच उपलब्ध करून दिले जात आहे. विविध प्रकारचा कंटेंट तयार करण्यासाठी क्रिएटर्ससाठी नवीन संधी उपलब्ध करून दिली जात आहे.
यामध्ये कलाकार, वित्त तज्ज्ञ, फँटेसी गेमिंग, वेलनेस, कॉमेडी, म्यूझिक, स्पोर्ट्स आणि इतर कॅटगरीमध्ये आपले कौशल्य दाखवून कमाई करू शकतील. कू अॅप गेल्या महिन्यापासून या फीचरची टेस्टिंग ऋषिका सिंग चंदेल, डॉ. क्रिक पॉइंट, आरती नागपाल यांच्यासह 20 क्रिएटर्ससोबत करत आहे आणि आता ते देशभरातील क्रिएटर्ससाठी आणत आहे.
या प्रीमियम सबस्क्रिप्शन फीचपने ग्रामीण आणि शहरी भारतातील प्रतिभावान महिला क्रिएटर्सना आधीच सक्षम केले आहे. यामध्ये मनोरंजक व्हिडिओ बनवणारी उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील एक गृहिणी रचना मावी आणि मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील कवयित्री अंजली गुप्ता यांचा समावेश आहे.
दरम्यान, येत्या काही महिन्यांत कू अॅप पत्रकार, बॉलीवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांसारख्या व्हेरिफाइड प्रोफाइल असलेल्या व्यक्तींना जोडण्याची योजना आखली आहे. जेणेकरून हे सर्व आपल्या सब्सक्रायबर्ससोबत जोडले जातील.