शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

देसी ट्विटर 'Koo App' बंद होणार, कंपनीच्या संस्थापकांनी लिंक्डइनवरुन दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 2:18 PM

Koo App : २०२० मध्ये सुरू झालेलं कू अॅप बंद होणार आहे, याबाबत संस्थापकांनी लिंक्डइनवर माहिती दिली आहे.

Koo App : २०२० मध्ये मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरला टक्कर देण्यासाठी नवीन देसी Koo App सुरु करण्यात आले होते. चार वर्षांपूर्वी आलेले कू ॲप नेटकऱ्यांना आवडलेलं नाही, त्यामुळेच गेल्या चार वर्षांपासून कंपनी बाजारात टिकून राहण्यासाठी धडपडत होती, मात्र आता अखेर कंपनीने कू ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

खूप दिवसांपासून Koo ॲपच्या अधिग्रहणाची चर्चा होती पण याचे अधिगृहन झाले नाही. कू कंपनीचे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी अलीकडेच LinkedIn वर एका पोस्टमध्ये माहिती दिली, या पोस्टमध्ये ते म्हणाले की, आम्ही अनेक मोठ्या इंटरनेट कंपन्या, समूह आणि मीडिया हाऊसशी चर्चा केली परंतु आम्हाला हवे तसे परिणाम मिळाले नाहीत, असं म्हटले आहे.

Adani News : अदानींवरील शॉर्ट सेलर अटॅकमध्ये कोणाचा हात, कोण आहेत यातील मुख्य पात्रं? वाचा हा संपूर्ण रिपोर्ट

२०२० मध्ये लाँच केलेले Koo ॲप ही पहिली भारतीय मायक्रोब्लॉगिंग साइट होती जी वापरकर्त्यांसाठी १० वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध होती. आत्तापर्यंत हे ॲप ६० मिलियन म्हणजेच ६ कोटींहून अधिक वेळा डाउनलोड झाले आहे.

कर्मचाऱ्यांना केलं कमी केलं

कू अॅप बंद होण्यापूर्वी कंपनीच्या सह-संस्थापकांनी ॲपबद्दल काही महत्त्वाची माहिती देखील शेअर केली आहे. Koo ॲपवर दर महिन्याला १० मिलियन सक्रिय वापरकर्ते, २.१ मिलियन रोजचे सक्रिय वापरकर्ते, दरमहा १०  मिलियन पोस्ट आणि ९ हजारांहून अधिक व्हीआयपी खाती होती. गेल्या काही दिवसापासून कू ॲप बंद होणार अशा चर्चा सुरू होत्या. एप्रिल २०२३ मध्ये कंपनीने आपल्या सुमारे एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले.

Koo ने देखील Accel आणि Tiger Global सारख्या गुंतवणूकदारांकडून ६० मिलियन डॉलरपेक्षा जास्त निधी उभारला होता, पण तरीही कंपनीने चांगली कामगिरी केली नाही.  Twitter ने जसं काम केलं तसं काम कू अॅप करु शकली नाही. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानTwitterट्विटर