शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

Twitter ला मिळणार टक्कर, Koo अ‍ॅपला टायगर ग्लोबलकडून 218 कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 9:15 PM

Koo : कू अ‍ॅपने गेल्या आठवड्यात सांगितले की, नवीन नियम लागू केले आहेत आणि गोपनीयता धोरण, वापरण्याच्या अटी आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वे आता नवीन नियमांच्या अनुषंगाने आहेत.

ठळक मुद्देया भारतीय मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटची निर्मिती मार्च 2020 मध्ये अप्रमेय राधाकृष्ण (Aprameya Radhakrishna) आणि मयंक बिदावत्क (Mayank Bidawatka) यांनी केली.

नवी दिल्ली : मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे (Twitter) प्रतिस्पर्धी असलेल्या स्वदेशी सोशल मीडिया अ‍ॅप कू (KOO)ने टायगर ग्लोबलच्या नेतृत्वात सीरिज बी फंडिंगद्वारे तीन कोटी अमेरिकन डॉलर्स (जवळपास 218 कोटी रुपये) जमा केले आहेत. (koo raises usd 30 million funding led by tiger global)

कू अ‍ॅपने एका निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या निधीत गुंतवणुकदारांमध्ये एक्सेल पार्टनर्स, कलारी कॅपिटल, ब्लूम व्हेंचर्स आणि ड्रीम इनक्यूबेटर यांनीही भाग घेतला. याशिवाय, आयआयएफएल आणि मिराए अ‍ॅसेट नवीन गुंतवणूकदार म्हणून उदयास आले आहेत.

जवळपास 60 लाख झाली Koo App च्या युजर्सची संख्याविशेष म्हणजे, ही गुंतवणूक अशा वेळी केली गेली आहे, जेव्हा देशात नवीन आयटी इंटरमीडियरी नियम (IT Intermediary Rules) अंमलात येण्यामुळे ट्विटर आणि फेसबुकसह सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारी वाढली आहे. कू अॅपचे जवळजवळ 60 लाख युजर्स आहेत. कू अ‍ॅपने गेल्या आठवड्यात सांगितले की, नवीन नियम लागू केले आहेत आणि गोपनीयता धोरण, वापरण्याच्या अटी आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वे आता नवीन नियमांच्या अनुषंगाने आहेत.

'यांनी' केली कू अ‍ॅपची निर्मितीकू अ‍ॅप हे ट्विटरला भारतीय पर्याय आहे. या भारतीय मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटची निर्मिती मार्च 2020 मध्ये अप्रमेय राधाकृष्ण (Aprameya Radhakrishna) आणि मयंक बिदावत्क (Mayank Bidawatka) यांनी केली. हे मुख्यत्वे ट्विटर सारखे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा उपयोग वेगवेगळ्या विषयांवर आपले मत देण्यासाठी केला जाऊ शकतो. 

11 भाषेत आहे, हे अ‍ॅप...सरकारद्वारे ऑगस्ट 2020 मध्ये देण्यात आलेल्या AatmaNirbhar App Innovation Challenge अंतर्गत या अ‍ॅपला तयार करण्यात आले आहे. हे अ‍ॅप हिंदी, तेलगू, कन्नड, बंगाली, तामिळ, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी, उडिया आणि आसामी भाषांना सपोर्ट करते. युजर्स कू अ‍ॅपद्वारे फोटो, ऑडिओ, व्हिडिओ आणि कंटेंट शेअर  करू शकतात. ट्विटरप्रमाणेच कू देखील आपल्या युजर्सला डायरेक्ट मेसेजद्वारे चॅट करण्याची परवानगी देते. इतकेच नाही तर युजर्स या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटवर कंटेंट शेअर करू शकतात.

कसे करावे डाऊनलोड Koo? जर तुम्हीही या मेड इन इंडिया अ‍ॅपचा वापर करायचा असले तर तुम्ही हे कू (koo) अ‍ॅप सहज डाऊनलोड करू शकता. हे दोन्ही आयफोन आणि अँड्राईड डिव्हाइसवर डाऊनलोड केले जाऊ शकते. अँड्राईड युजर अ‍ॅपला गुगल स्टोअर आणि आयओएस (iOS) युजर अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमधून डाऊनलोड करू शकतात.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर