कोइम्बतूर : स्कोडा आॅटो इंडिया कंपनीने तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे देशातील आपले सर्वांत मोठे सुविधा केंद्र (सर्व्हिस आऊटलेट) उभारले आहे. एसजीए कार्सच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन स्कोडा आॅटो इंडियाचे विक्री, सेवा व विपणन विभागाचे संचालक जॅक होलीस आणि एसजीए कार्स इंडियाचे मुख्य वितरक एस. अरपुथराज यांच्या हस्ते करण्यात आले.स्कोडाने ‘इंडिया २.०’ नावाची महत्त्वाकांक्षी योजना आखली असून, या योजनेंतर्गत आगामी तीन वर्षांत ५० नव्या शहरांत कंपनीचे वितरण जाळे विस्तारित करण्यात येणार आहे. कोइम्तूरमधील सुविधा केंद्राने कंपनीची तामिळनाडूतील तसेच दक्षिणेच्या राज्यांतील स्थिती मजबूत होईल.उप्पिलीपलयम मुख्य रस्त्यावर असलेले हे सुविधा केंद्र ४९,५८५ चौरस फूट जागेवर पसरलेले आहे. वर्कशॉपमध्ये ५० बेज आहेत. ४० समर्पित विक्री पश्चात सेवादाता कर्मचाऱ्यांमार्फत वर्षाला २० हजार वाहनांची देखभाल येथे केली जाऊ शकते.जॅक होलीस यांनी याप्रसंगी सांगितले की, कोइम्बतूरच्या अत्याधुनिक सुविधा केंद्रामुळे दक्षिणेतील राज्यांत कंपनीची उपस्थिती मजबूत होईल. अरपुथराज यांनी सांगितले की, या अत्याधुनिक सुविधा केंद्रामुळे आम्हाला अतुलनीय सेवा अनुभव ग्राहकांना देता येऊ शकेल. (वृत्तसंस्था)
स्कोडाने कोइम्बतूरला उभारले देशातील सर्वांत मोठे वर्कशॉप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 1:02 AM