सध्या 5G Phones ची जास्त चर्चा आहे, भारतात परदेशी कंपन्यांनी अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत. भारतीय कंपन्या मात्र कुठे दिसत नाहीत. परंतु आता स्वदेशी Lava Mobile कंपनी 5G फोन सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. दिवाळी नंतर Lava 5G Phone भारतात लाँच केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे. कंपनीने चुकून शेयर केलेल्या एका युट्युब व्हिडीओमधून लावाचा 5G स्मार्टफोन 9 नोव्हेंबरला मार्केटमध्ये लाँच होईल, हे समजले आहे.
Lava AGNI 5G ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स
Lava AGNI 5G मध्ये बेजल असलेला पंच-होल डिस्प्ले मिळेल. या पंच होलमध्ये स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यातील सेन्सरची माहिती समोर आली नाही, परंतु एलईडी फ्लॅश देण्यात येईल. या सेटअपमधील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असू शकतो.
रिपोर्ट्सनुसार Lava AGNI 5G मध्ये 4GB RAM मिळू शकतो. या फोनमध्ये कंपनीनं मीडियाटेक डायमेंसीटी 810 SoC मिळू शकतो, असे टिपस्टरने सांगितले आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी या आगामी लावा फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित कंपनीच्या कस्टमाइज्ड UI सह बाजारात येऊ शकतो.
Lava AGNI 5G ची किंमत
प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवने लावाच्या आगामी फोनच्या किंमतचा खुलासा केला आहे. त्यानुसार हा फोन 19,999 रुपयांमध्ये सदर केला जाऊ शकतो.