Lava नं भारतात आपले नवीन नेकबँड ईयरफोन्स Probuds N2 लाँच केले आहेत. या इयरफोन्सची खासियत म्हणजे यात मिळणारा 120 तासांचा स्टॅन्डबाय टाइम. तसेच यात 10mm ड्रायव्हर्स, ब्लूटूथ 5.0 कनेक्टिविटी आणि IPX4 रेटिंग असे फीचर्स देण्यात आले आहेत. लावा प्रोबड्स एन2 ची किंमत 1,199 रुपये ठेवण्यात आली आहे. हे नेकबँड इयरफोन्स ब्लॅक आणि टील कलरमध्ये लावा ई-स्टोर, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.
Lava Probuds N2 चे स्पेसिफिकेशन्स
Lava Probuds N2 नेकबँडमध्ये ड्युअल डिवाइस कनेक्टिविटी देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन डिवाइस या इयरफोन्सशी कनेक्ट करता येतात. तर कॉल अलर्ट फिचर आलेल्या कॉलची माहिती देतो. यातील 110mAh ची बॅटरी सिंगल चार्जमध्ये 4 तासांचा प्लेबॅक टाइम देते. हे इयरफोन्स 20 मिनिटांत फुल चार्ज होतात. तसेच हे इयरफोन्स 120 तासांचा स्टॅन्डबाय टाइम देतात.
हे इयरफोन्स दीर्घकाळ वापरता यावे म्हणून अर्गोनोमिक डिजाइनसह सादर करण्यात आले आहेत. Probuds N2 मधील 10mm डायनॅमिक ड्रायव्हर्स चांगला बास देतात. तर यातील ब्लूटूथ v5.0 कनेक्टिविटी 10 मीटर पर्यंतची रेंज देते. यातील मॅग्नेटिक लॉक्स वापरून इयरबड्स एकत्र ठेवतो. तर इयरफोन्समधील इनबिल्ट पॅनल कंट्रोलच्या मदतीने एंटरटेनमेंट आणि ऑफिस कॉल्स कंट्रोल करता येतात.