लावाने भारतात Lava Probuds N1 नावाचे नवीन नेकबँड-स्टाइल इयरफोन सादर केले आहेत. हे इयरफोन इन-इयर डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत. तसेच यात ड्युअल कनेक्टिविटी आणि कॉलसाठी व्हायब्रेशन अलर्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. जे 30 तासांचा बॅटरी बॅकअप देतात असा दावा करण्यात आला आहे.
Lava Probuds N1 ची किंमत
Lava Probuds N1 इयरबड्सची किंमत 1,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह अॅमेझॉन इंडियावर देखील खरेदीसाठी उपलब्ध होतील. ग्राहकांना Charcoal Grey आणि Berry Blue अशा दोन रंगांमधून एकाची निवड करता येईल.
स्पेसिफिकेशन
या इयरफोनमध्ये मेटल आणि सिलिकॉनचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही इयरटीप्सच्या मागे चुंबक आहे जो दोन्ही इयरटीप्सचा एकत्र ठेवतो. तर इयरप्लग्ससाठी सिलिकॉनचा वापर करण्यात आला आहे. Lava Probuds N1 मध्ये 10mm चे ड्युअल ड्रायव्हर्स आहेत. हा डिवाइस IPX5 वॉटर रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे.
Lava Probuds N1 मध्ये पॉवर ऑन-ऑफ करण्यासाठी एक स्लाइडर बटण मिळतो. यातील ड्युअल कनेक्टिविटी फीचरच्या मदतीने एकसाथ दोन डिवाइस कनेक्ट करता येतील. Bluetooth v5 सह येणारे हे इयरफोन्स इनकमिंग कॉलसाठी व्हायब्रेशन अलर्ट देखील देतात.
Lava Probuds N1 मध्ये 220mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी फक्त 20 मिनिटांच्या चार्जवर 8 तासांचा प्ले-बॅक देतात. फुल चार्ज केल्यावर हे इयरबड्स 30 तासांचा प्ले-बॅक टाइम आणि 200 तास स्टॅन्डबाय टाइम देऊ शकतात, असा दावा कंपनीने केला आहे.