शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

१ रुपयांत मिळणार वायरलेस ईयरबड्स; या दिवशी घेता येणार 'Lava' च्या इंट्रोडक्टरी ऑफरचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 3:00 PM

Lava कंपनीची ट्रू वायरलेस इयरफोन सेगमेंटमध्ये एन्ट्री. कंपनी लाँच करणार आपला पहिला ट्रू वायरलेस इयरफोन.

ठळक मुद्देLava कंपनीची ट्रू वायरलेस इयरफोन सेगमेंटमध्ये एन्ट्री.कंपनी लाँच करणार आपला पहिला ट्रू वायरलेस इयरफोन.

Lava True Wireless Earbuds : 21 जून रोजी जगभरात वर्ल्ड म्युझीक डे (World Music Day) साजरा केला जातो. यादरम्यान, भारतीय मोबाईल कंपनी लावानं ट्रू वायरलेस सेगमेंटमध्ये एन्ट्री करत आपला पहिला प्रोडक्ट Lava Probuds लाँच केला आहे. एक खास बाब म्हणजे कंपनीनं हे इयरबड्स एका इंट्रोडक्टरी ऑफरसह लाँच केले आहेत. ऑफर अंतर्गत ग्राहकांना हे इयरबड्स Lava E-store, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून केवळ १ रूपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 24 जून रोजी दुपारी 12 वाजता ही ऑफर सुरू होणार असून स्टॉक संपेपर्यंत ती सुरू राहिल.

२५ तास चालणार बॅटरीलावा प्रोबड्समध्ये 11.6mm अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर्स आि मीडियाटेक Airoha चिपसेट देण्यात आला आहे. साईजमध्ये हे इयरबड्स छोटे वाटत असले तरी Bass सोबत पॉवरफुल साऊंडचा अनुभव याद्वारे घेता येतो. यामध्ये  55mAh क्षमतेची बॅटरी (दोन्ही बड्समध्ये निरनिराळी) देण्यात आली आहे. याशिवाय केसमध्ये 500mAh क्षमतेची बॅटरी मिळते. सलग 25 तास म्युझिक ऐकता येऊ शकतं असा दावाही कंपनीनं केला आहे. 

Lava Probuds चा परफॉर्मन्स उत्तम असून यामध्ये प्रीमिअम डिझाईन, सुंदर ब्लॅक कलर आणि जबरदस्त मॅट फिनिश पाहायला मिळतं. ग्राहकांकडून फीडबॅक घेतलव्यानंतर आणि कानांवर ट्रायल घेतल्यानंतरच हे इयरबड्स तयार करण्यात आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

ऑफरनंतर 'इतकी' असेल किंमतलावाचे हे नवे इयरबड्स वेक अँड पेअर तंत्रज्ञानावर आधारित आहेत. चार्जिंग केस उघडल्यानंतर इयरबड्सला पॉवर मिळते आणि कनेक्ट होण्यासाठी ते तयार होतात. यामध्ये Bluetooth v5.0 कनेक्टिव्हीटी आणि म्युझिक कंट्रोलचं फीचरही मिळतं. हे इयरबड्स IPX5 वॉटर आणि स्वेट रेजिस्टेंट आहेत. या इयरबड्ससोबत वॉईस असिस्टंटचही फीचर मिळतं. या प्रोडक्टसह एका वर्षाची वॉरंटी देण्यात येत असून इट्रोडक्टरी ऑफर नंतर Lava Probud साठी 2,199 रूपये खर्च करावे लागतील.

टॅग्स :lavaलावाamazonअ‍ॅमेझॉनFlipkartफ्लिपकार्टonlineऑनलाइन