मुंबई: लाव्हा कंपनीने अँड्रॉइड गो या प्रणालीवर चालणार्या लाव्हा झेड ५० या एंट्री लेव्हलच्या स्मार्टफोनला बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
गुगलने किफायतशीर दराच्या आणि एंट्री लेव्हलचे फिचर्स असणार्या स्मार्टफोन्सच्या युजर्सला अँड्रॉइडच्या अद्ययावत आवृत्तीचा वापर करण्यासाठी अँड्रॉइड ओरियो (गो एडिशन) ही स्वतंत्र आवृत्ती सादर केली होती. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वीच एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया १ हा अँड्रॉइड गो या प्रणालीवर चालणार्या स्मार्टफोनचे अनावरण केले होते. यानंतर लाव्हा कंपनीने याच प्रकारातील लाव्हा झेड ५० हे मॉडेल सादर करण्याची घोषणा केली आहे. यात ४.५ इंच आकारमानाचा डिस्प्ले असेल. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे.
लाव्हा झेड ५० या मॉडेलमध्ये ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा रिअर आणि फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील मुख्य कॅमेर्यात बोके इफेक्टची सुविधा असेल. यात हिंदी व मराठीसह १० भारतीय भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. या मॉडेलला दोन वर्षांची वॉरंटी प्रदान करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एयरटेलने सादर केलेल्या कॅशबॅक योजनेत या स्मार्टफोनला विकत घेणार्या ग्राहकांना दोन हजार रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. याचे मूल्य आणि उपलब्धता याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी हा स्मार्टफोन मार्चच्या मध्यावर भारतीय ग्राहकांना देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात येईल असे मानले जात आहे.