Layoff in IT Field : काही काळापासून टेक्नॉलॉजी क्षेत्रात टाळेबंदीची त्सुनामी आली आहे. जगभरातील आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. गेल्या महिन्यात, म्हणजेच ऑगस्टमध्ये 27 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे, इंटेल, IBM आणि Cisco Systems सारख्या बड्या कंपन्यांसह 40 हून अधिक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे.
1.30 लाख कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्याआयटी कंपन्यांनी 2024 मध्ये आतापर्यंत 1.30 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढले आहे. ऑगस्टमध्ये जगातील सर्वात मोठ्या चिप उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या इंटेलने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के, म्हणजेच 15 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. 2025 पर्यंत खर्च $10 अब्ज कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
इंटेलला खर्च कमी करण्यासाठी आणि आपल्या रणनीतीमध्ये मोठे बदल करण्यासाठी असे कठीण निर्णय घेणे भाग पडले आहे. यानंतर नेटवर्किंग जगतातील मोठे नाव असलेल्या Cisco Systems ने देखील 7 टक्के, म्हणजेच 6000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे लक्ष आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि सायबर सुरक्षा क्षेत्रांवर आहे. या व्यतिरिक्त, ज्या मोठ्या कंपन्यांनी टाळेबंदीची घोषणा केली आहे, त्यापैकी IBM ने चीनमधील त्यांचे R&D ऑपरेशन्स बंद केले आणि 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले.
अॅपल कंपनीत टाळेबंदीआयफोन बनवणाऱ्या ॲपलने आपल्या सेवा समूहातील 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. डेलनेही आपले जागतिक कर्मचारी 10 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे 12,500 कर्मचारी प्रभावित होऊ शकतात. याशिवाय, GoPro ने त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के, म्हणजेच 140 नोकऱ्या रद्द केल्या आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील टाळेबंदीचा हा टप्पा यापुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत बेरोजगारांची संख्या वाढ शकते.