Elon Musk आणि ट्विटर यांच्यातील सौदा 44 अब्ज डॉलर्समध्ये ठरला आहे. यामुळे पब्लिक असलेली कंपनी आता इलॉन मस्क यांच्या मालकीची प्रायव्हेट कंपनी होणार आहे. या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर अनेक बदल मस्क करणार आहेत, याची माहिती वेळोवेळी त्यांनी विविध माध्यमांतून दिली आहे. परंतु ही बातमी येताच ट्विटरवरच #LeavingTwitter ट्रेंड होऊ लागला.
ट्विटर युजर्सनी आपल्या शैलीतून या बातमीला प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी ट्विटर सोडून जाण्याच्या हॅशटॅग ट्रेंडमध्ये सहभाग घेतला आहे. याबाबत मोठ्याप्रमाणात मीम देखील शेयर केले आहेत. तुम्ही देखील ट्विटर सोडण्याचा विचार करत असाल तर फक्त ट्विटर अॅप अनइन्स्टॉल करून चालणार नाही. तुम्हाला तुमचं अकाऊंट डिअॅक्टिव्हट किंवा डिलीट करावं लागेल. याची संपूर्ण पद्धत आम्ही पुढे सांगितली आहे.
असं डिअॅक्टिव्हेट करा तुमचं Twitter Account
- सर्वप्रथम तुमचं Twitter अॅप ओपन करा आणि तुमच्या अकाऊंट मध्ये साइन-इन करा.
- त्यानंतर डावीकडे वरच्या बाजूला असलेल्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा.
- आता साईड मेन्यू ओपन होईल, त्यात सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी ऑप्शनची निवड करा.
- इथे अकाऊंटवर जाऊन Deactivate your account वर क्लिक करा.
- डिअॅक्टिव्हेटवर क्लिक करा.
- आता तुम्हाला पॉसवर्ड एंटर करावा लागेल आणि पुन्हा डिअॅक्टिव्हेटवर टॅप करावे लागेल.