Lenovo ने जगातील पहिला फोल्डेबल लॅपटॉप भारतात लाँच केला आहे. हा लॅपटॉप कंपनीने Thinkpad लाइनअपमध्ये लाँच केला असून हा Lenovo Thinkpad X1 Fold नावाने सादर करण्यात आला आहे. गेल्यावर्षी CES मध्ये Thinkpad X1 Fold कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच केला होता. हा लॅपटॉप एखाद्या टॅबप्रमाणे वापरता येतो. परंतु, या लॅपटॉपमध्ये कंपनीने मल्टीलिंक टॉर्क हिंट डिजाइन देण्यात आली आहे, यामुळे Thinkpad X1 Fold चा डिस्प्ले फोल्ड होतो. Thinkpad X1 Fold मध्ये कंपनीने OLED डिस्प्ले, Intel Core i5 प्रोसेसर आणि 11th Gen Intel UHD इंटेग्रेटेड ग्राफिक्स असे फीचर्स दिले आहेत. या लॅपटॉपमध्ये 8GB LPDDR4X RAM आणि 1TB PCIe-NVMe M.2 SSD स्टोरेज मिळते.
Lenovo Thinkpad X1 Fold ची किंमत
Lenovo Thinkpad X1 Fold लेनवोने भारतात 3,29,000 रुपयांमध्ये सादर केला आहे. Lenovo Easel Stand आणि Bluetooth Mini Fold Keyboard सह हा लॅपटॉप लेनवो इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येईल.
Lenovo Thinkpad X1 Fold चे स्पेसिफिकेशन्स
Lenovo Thinkpad X1 Fold मध्ये 13.3-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2048 × 1536 (2K) पिक्सल आहे. हा लॅपटॉप Windows 10 Pro ओएससह येतो. हा फोल्डेबल लॅपटॉपमध्ये कंपनीने Intel Core i5-L16G7 प्रोसेसर आणि 11th Gen Intel UHD ग्राफिक्स कार्डसह सादर केला आहे. Thinkpad X1 Fold मध्ये 8GB LPDDR4X RAM आणि 1TB पर्यंत PCIe-NVMe M.2 SSD स्टोरेज देण्यात आली आहे.
Thinkpad X1 Fold ची खासियत यात देण्यात आलेला हिंज. हजारो वेळा घडी करूनही या हिंजमधील ताण कमी झाला नाही, असा दावा कंपनीने केला आहे. हा हिंज 12 मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन मेथड आणि 27 प्रोसेजर्स (MIL-STD 810H) सह सादर करण्यात आला आहे. यात ड्यूरेबल मल्टीलिंक टॉर्क हिंज डिजाइन देण्यात आली आहे. लेनोवो Thinkpad X1 Fold मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6, Bluetooth v5.1 आणि 2 USB Type-C देण्यात आले आहेत. विशेषम्हणजे कंपनीने यात 4G LTE आणि 5G सपोर्टसह देखील देण्यात आला आहे. Thinkpad X1 Fold मध्ये 50Wh ची बॅटरी आहे.