Lenovo Tablet Price Specification: लेनोवोने आपला अँड्रॉइड टॅबलेट पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीने Lenovo Xiaoxin Pad Pro टॅबलेट चिनी बाजारपेठेत उतरवला आहे. ज्यात AMOLED Display, 10200mAh battery आणि 8GB RAM देण्यात आला आहे. त्याचबरोबर Lenovo Xiaoxin Pad Pro मध्ये 2.5K रिजोल्यूशन असलेला शानदार डिस्प्ले देण्यात आला आहे.
Lenovo Xiaoxin Pad Pro Price
Lenovo Xiaoxin Pad चा एकमेव व्हेरिएंट चीनमध्ये 3999 युआन मध्ये उपलब्ध झाला आहे. ही किंमत जवळपास 43,144 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा टॅब भारतात कधी येईल हे मात्र सध्या काहीच सांगता येणार नाही.
Lenovo Xiaoxin Pad Pro चे स्पेसिफिकेशन्स
Lenovo Xiaoxin Pad Pro मध्ये 12.6 इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा 2.5K रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा अॅमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह सादर करण्यात आला आहे. या टॅबमध्ये ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसरची पॉवर देण्यात आली आहे. सोबत 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 1TB पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी या टॅबच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13MP चा मुख्य सेन्सर आणि 5MP चा अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या लेनोवो टॅबमध्ये पॉवर बॅकअपसाठी 10200mAh ची दमदार बॅटरी मिळते जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.