नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक विचित्र किंवा अनोख्या गोष्टी पाहिल्या असतील. पण तुम्ही कधी हवेत उडणारा एलईडी बल्ब (LED Bulb) पाहिला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र बल्बबाबत सांगणार आहोत, जो दिसायला खूप सुंदर आहे. पण तो ऑन केल्यानंतर हवेत उडू लागतो.
दरम्यान, ज्या बल्बबद्दल बोलत आहोत त्याचे नाव Juliain Wisio Levitating Floating Wireless LED Light Bulb Desk Lamp असे आहे. अॅमेझॉनवर (Amazon) मिळणारा हा लाइट बल्ब प्रत्यक्षात एक डेस्क लॅम्प आहे. जो दिसायला अतिशय आकर्षक आहे. हा बल्ब भेटवस्तू म्हणून खूप वापरला जातो आणि वापरायलाही खूप सोपा आहे. तुम्ही तो ऑन करताच तो हवेत तरंगू लागतो.
हा बल्ब कसा काम करतो असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगतो. हा बल्ब सेट करून वापरणे खूप सोपे आहे. या बल्बसोबत एक बेस देखील दिला जातो, ज्यामध्ये वायर जोडलेली असते. तुम्ही या बल्बला पॉवरशी कनेक्ट करून ऑन करताच, तो चुंबकाच्या मदतीने हवेत, बेसच्या किंचित वर, कोणत्याही आधाराशिवाय पेटतो.
Amazon वरून खरेदी करू शकतातुम्ही Amazon वरून Juliain Wisio Levitating Floating Wireless LED Light Bulb Desk Lamp सहज खरेदी करू शकता. हवेत तरंगणाऱ्या या बल्बची किंमत 19,999 रुपये आहे. तुम्ही Amazon वरून 50% च्या सवलतीनंतर 9,999 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही ते तीन महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर 3,333 रुपये प्रति महिना देखील खरेदी करू शकता. तसेच, या डीलमध्ये ईएमआय व्यतिरिक्त तुम्हाला अनेक बँक ऑफर आणि कॅशबॅक संधी देखील दिल्या जात आहेत.