शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

एलजीचा नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन : दणदणीत फिचर्सचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 4:58 PM

LG G7 Plus ThinQue Feature : एलजी जी७ प्लस थिनक्यू हा नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला असून यामध्ये अतिशय सरस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

एलजी जी७ प्लस थिनक्यू हा नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला असून यामध्ये अतिशय सरस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

एलजी कंपनीने या वर्षी मे महिन्यात जी७ थिनक्यू हा स्मार्टफोन बाजारपेठेत लाँच केला होता. आता याचीच पुढील आवृत्ती एलजी जी७ प्लस थिनक्यू या मॉडेलच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. याचे मूल्य ३९,९९० रूपये असून १० ऑगस्टपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून याला उपलब्ध करण्यात येणार आहे. 

एलजी जी७ प्लस थिनक्यू या मॉडेलमध्ये ६.१ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस म्हणजे ३१२० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले १५:५:९ या अस्पेक्ट रेशोने युक्त असून याच्या वरील बाजूस आयफोन एक्स या मॉडेलप्रमाणे नॉच देण्यात आलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा अतिशय गतीमान असा स्नॅपड्रॅगन ८४५ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये डीटीएस :एक्स आणि हाय-फाय क्वॉड डीएसी या प्रणालींचा सपोर्ट आहे. यामुळे यात अतिशय उच्च दर्जाच्या ध्वनीची अनुभूती घेता येत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. तसेच यात सुपर फार फिल्ड व्हॉइस रिकग्नेशन आणि अतिशय संवेदनशील असा मायक्रोफोन देण्यात आला आहे. यामुळे यात अगदी पाच मीटर अंतरावरूनही ध्वनी आज्ञावली (व्हाईस कमांड) देता येत असल्याचे एलजीने नमूद केले आहे.  यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असून फेस अनलॉकची सुविधादेखील देण्यात आली आहे. 

एलजी जी७ थिनक्यू प्लस या स्मार्टफोनच्या मागील बाजूस १६ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले असून यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात वायरलेस चार्जींगच्या सुविधेने युक्त असणारी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे. हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्यामुळे याला कोणत्याही विषम वातावरणात वापरणे शक्य आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलLGएलजी