शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

अरे वा! आता इयरबड्समुळे कानात बॅक्टेरिया नाही जाणार; यूव्ही टेक्नॉलॉजीसह LG Tone Free इयरबड्स लाँच  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 5:40 PM

LG Tone Free DFP8W ची किंमत 179 युरो (सुमारे 15,900 रुपये) आहे.  

एलजीने LG Tone Free DFP8W ट्रू वायरलेस स्टिरियो (TWS) इयरबड्स लाँच केले आहेत. हे इयरबड्स अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) आणि 24 तासांपर्यतच्या बॅटरी बॅकअपसह सादर करण्यात आले आहेत. या इयरबड्सची खासियत म्हणजे यांच्यासोबत मिळणारी चार्जिंग केस. या चार्जिंग केस मध्ये UVnano टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी इयरबड्सवरील 99.9 टक्के जिवाणू फक्त पाच मिनिटांत मारू शकते.  (LG launches Tone Free DFP8W TWS earbuds with Active Noise Cancellation)

LG Tone Free DFP8W स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स  

LG Tone Free DFP8W मध्ये 8mm डायनॅमिक ड्रायव्हर देण्यात आला आहे. यात देण्यात आलेल्या तीन माईक पैकी दोनचा वापर कॉल्स करताना केला जातो तर तिसरा माईक अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसाठी वापरला जातो. या बड्स मध्ये अ‍ॅम्बिएन्ट आणि चॅट असे दोन साऊंड मोडस आहेत. यात IPX4 वॉटर आणि स्वेट रेजिस्टन्स देण्यात आला आहे. सोबत मेडिकल ग्रेड इयरटीप्स देखील मिळतात.  

LG Tone Free DFP8W मध्ये ब्लूटूथ 5.2, गुगल फास्ट पेरींग आणि विंडोज स्विफ्ट पेयर प्रोटोकॉल सपोर्ट देण्यात आला आहे. यातील गेम मोडमुळे लेटन्सी कमी होते. यात टच कंट्रोल्स देखील देण्यात आले आहेत. हे इयरबड्स अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनविना 10 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. तर केसमध्ये 14 तासांचा अतिरिक्त बॅटरी बॅकअप मिळतो.  

LG च्या इयरबड्स सोबत मिळणारी चार्जिंग केस यूएसबी टाईप सी वायर्ड चार्जिंग सोबतच वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यातील यूव्ही टेक्नॉलॉजी इयरबड्सवरील जिवाणू आणि जंतू मारून टाकते, असा दावा कंपनीने केला आहे.  

LG Tone Free DFP8W ची किंमत  

LG Tone Free DFP8W ची किंमत 179 युरो (सुमारे 15,900 रुपये) ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स एलजी जर्मनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आले आहेत. हे बड्स Charcoal Black, Haze Gold, आणि Pearl White रंगात उपलब्ध होतील. 

टॅग्स :LGएलजीtechnologyतंत्रज्ञान