शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

एलजी व्ही३०एस थिनक्यू आणि व्ही३० एस थिनक्यू प्लसचे अनावरण

By शेखर पाटील | Published: February 26, 2018 3:21 PM

एलजी कंपनीने आपल्या व्ही३० या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनची एलजी व्ही३०एस थिनक्यू (LG V30S ThinQ ) ही नवीन आवृत्ती दोन व्हेरियंटच्या माध्यमातून बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

एलजी कंपनीने आपल्या व्ही३० या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनची एलजी व्ही३०एस थिनक्यू (LG V30S ThinQ ) ही नवीन आवृत्ती दोन व्हेरियंटच्या माध्यमातून बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

कंपनीने व्ही३०एस थिनक्यू आणि व्ही३० एस थिनक्यू प्लस हे दोन नवीन स्मार्टफोन्स जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. एलजी कंपनीने आधी सादर केलेल्या व्ही ३० या मॉडेलच्या या सुधारित आवृत्त्या आहेत. यात मूळ मॉडेलमधील बहुतांश फिचर्स असून फक्त वाढीव रॅम, स्टोअरेज आदींचा बदल करण्यात आला आहे. एलजी व्ही ३० या मॉडेलमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज देण्यात आले होते. तर व्ही३०एस थिनक्यू या मॉडेलमध्ये ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज तसेच व्ही३०एस थिनक्यू प्लस या मॉडेलमध्ये ६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज प्रदान करण्यात आले आहे. तसेच या दोन्ही मॉडेल्ससाठी प्लॅटीनम ग्रे आणि मोरक्कन ब्ल्यू हे दोन नवीन रंगांचे पर्यायदेखील ग्राहकांना देण्यात आले आहेत. 

एलजी व्ही३०एस थिनक्यू आणि व्ही३० एस थिनक्यू प्लस या दोन नवीन स्मार्टफोनमधील कॅमेर्‍यांमध्ये या कंपनीने विकसित केलेल्या आर्टीफिशियल इंटिलेजियन्स म्हणजेच ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत ‘एआय कॅम’, क्यूलेन्स आणि ब्राईट मोड हे तीन फिचर देण्यात आले आहेत. यातल्या ‘एआय कॅम’चा वापर करून कुणीही पोर्टेट, फुड, पेट, लँडस्केप, सिटी, फ्लॉवर, सनराईज आणि सनसेट अशा आठ विविध प्रकारांमध्ये चित्रीकरण करू शकतो. क्यूलेन्स या फिचरच्या मदतीने अगदी सुलभपणे क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन शॉपींग करता येते. तर ब्राईट मोड या फिचरचा उपयोग करून कमी उजेडातही उत्तम दर्जाच्या प्रतिमा घेता येत असल्याचे एलजी कंपनीने स्पष्ट केले आहे.

एलजी व्ही३०एस थिनक्यू आणि व्ही३० एस थिनक्यू प्लस या दोन्ही मॉडेल्समध्ये कंपनीने ‘व्हाईस एआय’ तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. यात डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटप्रमाणे ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने विविध फंक्शन्स उदा अ‍ॅप सुरू करणे, सेटींग बदलणे आदी पार पाडता येतात. यासोबत या दोन्ही स्मार्टफोनमध्ये गुगल असिस्टंटचा सपोर्टदेखील देण्यात आला आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार करता, एलजी व्ही३०एस थिनक्यू आणि व्ही३० एस थिनक्यू प्लस या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस म्हणजेच १४४० बाय २८८० पिक्सल्स क्षमतेचा, १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा ओएलईडी फुलव्हिजन डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर दिलेला आहे. यांच्या मागील बाजूस एफ/१.६ अपार्चर, ७१ अंशाच्या लेन्सयुक्त १६ मेगापिक्सल्स आणि एफ/१.६ अपार्चर व १२० अंशाच्या लेन्सने युक्त १३ मेगापिक्सल्सचा असा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर यात ९० अंशाच्या लेन्सने युक्त व एफ/१.९ अपार्चर असणारा ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. क्वॉलकॉमच्या क्विकचार्ज या तंत्रज्ञानाने युक्त असणारी यात ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. या दोन्ही मॉडेल्सचे मूल्य आणि उपलब्धता लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे एलजी कंपनीने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :LGएलजीMobileमोबाइल